Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,…तर इथे शिवाजी देखील उभे ठाकले काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

मराठी ई-बातम्या टीम

आक्रमण करणाऱ्यांनी या नगरीवर हल्ले केले आणि उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. औरंगजेबाने केलेले अत्याचार त्याच्या दहशतीची साक्ष देतात. त्याने तलवारीच्या बळावर येथे बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाच्या मातीत इतर जगापेक्षा काही वेगळं आहे. येथे औरंगजेब आला तर शिवाजी देखील उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची ताकद दाखवून देतात. इंग्रजांच्या काळात देखील काशीच्या लोकांनी हेस्टिंगचे काय हाल केले होते हे येथील लोकांना माहिती असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगत उत्तर प्रदेशातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिली.

आज संध्याकाळी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मोदींनी उपस्थिताकडून ३ महत्त्वाची वचनं घेतली. तसेच हे वचनं पाळण्याचं आश्वासनही घेतले. प्रत्येक भारतीयाच्या हातांमध्ये अकल्पनीय असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची ताकद आहे. आम्हाला तप, तपस्या माहिती आहे. आम्हाला देशासाठी रात्रंदिवस कष्ट करायचे माहिती आहे. आव्हान कितीही मोठं असेना आम्ही भारतीय ते आव्हान पेलू शकतो. विनाश करणाऱ्यांची शक्ती कधीही भारताच्या शक्ती-भक्तीपेक्षा मोठी असू शकत नाही. ज्या दृष्टोकोनातून आपण जगाला पाहतो आणि त्याच दृष्टीकोनातून जग आपल्याला पाहत असल्याचे लक्षात ठेवा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अनेक वर्षांच्या गुलामगिरीने आपल्यावर परिणाम केला होता, भारताला हीन भावनेने भरून टाकले होते. मात्र, आजचा भारत त्या हीन भावनेतून बाहेर पडत आहे. आजचा भारत केवळ सोमनाथ मंदिराचं सौंदर्यीकरणच करत नाही, तर समुद्रात हजारो किलोमीटर ऑप्टिकल फायबर देखील पसरवत आहे. आजचा भारत केदारनाथचा जिर्णोद्धारच करत नाही, तर स्वतःच्या हिमतीवर अंतराळात भारतीयांना पाठवण्याच्या तयारीत आहे. आजचा भारत केवळ अयोद्ध्येत प्रभु रामाचे मंदीरच बनवत नाही, तर देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज देखील बनवत असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

आणि वडेट्टीवारांनी उडविली पडळकरांची खिल्ली, “नया नया पंछी ज्यादा फडफड…” वडेट्टीवार पडळकरांचा ओबीसीवरून नवा वाद

मराठी ई-बातम्या टीम ओबीसी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयात उद्या सोमवारी सुणावनी असून या पार्श्वभूमीवर ओसीबी समाजाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *