Breaking News

विरोधकांचा सवाल, ते पलंग कोणासाठी : तर मुख्यमंत्री म्हणाले, जमिनीवर झोपणार काय पाच पैकी एक पलंग गायब चार पलंग बाहेर व्हरांड्यातच

बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यात मोठी खळबळ माजलेली आहे. त्या हत्येचा मास्टर माईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला ज्या पोलिस कस्टडीत ठेवण्यात आले आहे, त्या पोलिसांनी पलंग मागविल्याचा आल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यावर प्रत्युत्तरा दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तपास आधिकारी काय खाली जमिनीवर झोपतील का असे प्रत्त्युत्तर विरोधकांच्या टीकेला दिले.

या संदर्भात उलट सुलट चर्चेला उधाण आले असून सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी वाल्मिकी कराड केव्हा पासून फरार होता त्यावेळी तपास अधिकारी आले नव्हते का, वाल्मिक कराडला कोठडीत ठेवल्यानंतरच कसे काय पलंग मागविले अशा चर्चा होत आहेत. पोलिस ठाण्यात आलेल्या पलंगाची आमदार रोहित पवार यांनी पोस्ट करत हे पलंग आरोपींसाठी मागवले आहेत का? असा सवाल केला, तर विजय वडेट्टीवार यांनीही या पलंगावरून प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर वाल्मिक कराड सरकारचा लाडका आरोपी अशाही चर्चांना उधाण आले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

पलंगाच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही सत्य न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण आरोप करत आहेत. जे या प्रकरणावर बोलत आहेत ते केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलत असतात. पोलिसांनी पण स्पष्ट केले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी अधिकची कुमक पोलिस स्टेशनला आली आहे. त्या अधिकाऱ्यांना जमीनीवर तर झोपवता येणार नाही. त्यांच्यासाठी हे पलंग आणले आहेत प्रसिद्धीची हाव ज्यांना आहे ते असे आरोप करत असल्याचेही यावेळी सांगितले.

तर पोलिस अधिक्षक म्हणाले की, बीड पोलिस ठाणे नव्याने बांधण्यात आले आहे. पोलिस अधिकारी, अंमलदारांसाठी ज्या सुविधा असतात त्या देण्याचं कामही सुरु आहे. सध्या आरोपींसाठी असलेले सुरक्षारक्षक २४ तासांसाठी असतात. यांना आराम मिळावा म्हणून काही खास खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यांनी आम्हाला विनंती केली होती की आमच्यासाठी आराम करण्याची खोली आहे पण पलंग नाहीत. त्यानंतर त्यांच्या आरामासाठी पलंगांची सोय करण्यात यावी यासाठी आम्ही हे पलंग मागवले आहेत. वाल्मिक कराड किंवा कुठल्याही आरोपींसाठी आम्ही पलंगांची वगैरे सोय केलेली नसल्याचा खुलासा केला.

सरपंच हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमदार सुरेश धस यांच्या निवेदनानंतर मी बीडबाबत सुरेश धस यांच्याशी चर्चा केली. सरपंच हत्या प्रकरणाचा खटला लढवण्याची विनंती उज्वल निकम यांना मी केली. त्यांनी होकार दिला आहे पण त्यांची काही काम आटोपल्यानंतर दोन दिवसात नियुक्तीबाबत निर्णय घेऊ असे असेही यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *