Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आघाडी सरकार हरवलय…. हे सरकार गरीबांचे नव्हे तर दारू विकणाऱ्यांचे सरकार असल्याचा आरोप

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील हे सरकार हे गरीबांचे सामान्य माणसांच नाही तर सामान्य माणसांच्या विरोधातील सरकार असून या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता. तसेच हे सरकार काम करताना दिसत नसून आघाडी सरकार सध्या हरवलं आहे. या सरकारला शोधून देणाऱ्यास पुरस्कार देवू अशी उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावत टीका केली.

लाखणी येथे उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आले असता ते बोलत होते.

मी मुख्यमंत्री असताना धानाचा बोनस देण्याची सुरुवात केली. पूर्वी आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घोषणा करायचो. पण या सरकारने बोनसच बंद केल्याचा आरोप करत नाना पटोले म्हणतात संविधान खतरे में है, पण खरे तर धान पीक घेणारे शेतकरीच खरे खतरे में आहेत, असा पलटवारही त्यांनी यावेळी केला.

आम्ही ५ वर्षात एकाही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. मात्र या सरकारच्या काळात रोज वीज कापली जात आहे. एका डीपीवर ४ शेतकऱ्यांनी वीज भरली नाही तर पूर्ण डीपी काढून नेण्याचे काम केले गेले आहे. कोरोनाच्या काळात या सरकारने जराही मदत केली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

बार मालक शरद पवारांकडे गेले. तिथे गेल्यावर त्यांनी लायसन्स फी कमी करून घेतली. विदेशी दारुवर ५० टक्के कर माफ करून घेतला. विदेशी दारु स्वत झाली. हे दीन दलित, गरीबांचे सरकार नसून दारु विकणाऱ्यांचे सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

या सरकारला मराठा आरक्षण देता आलं नाही. ओबीसी आरक्षण रद्द करण्याचे पाप या सरकारने केले आहे. ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ओबीसींचे राजकीय प्रतिनिधीत्वच धोक्यात आले. या सरकारने इम्पिरिकल डेटा वेळीच जमा केला असता तर आज ही वेळ आली नसती असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

काल अमित शाह यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील सभेत बोलतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत सहकारी असलेले सहकारी साखर कारखाने खाजगी कसे झाले असा सवाल करत सहकार अडचणीत असल्याचे सांगता तर मग सहकार चळवळीला मदत का करत नाही असा उपरोधिक टोलाही राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला होता.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

Telangana Election : मतदारांना उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन, जाणून घ्या, कोणत्या जागा विशेष !

Telangana Election : ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी गुरुवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *