राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विरोधकांना संपविण्यासाठी कट कारस्थान करण्यात येत असून यात विशेष सरकारी वकील चव्हाण हा सहभागी असल्याचा खळबळजनक दावा या चव्हाणने जळगांव मधील जे पूर्वी भाजपामध्ये होते मात्र आता ते तुमच्या पक्षात नेते आलेले त्यांच्या मदतीने भाजपा आमदार गिरीष महाजन यांना मोक्का कायद्याखाली गुंतविण्याच्या कटाचा भंडाफोड विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी विधानसभेत केला.
फडणवीस यांच्या या बॉम्बगोळ्याने महाविकास आघाडी अख्खी गारदच झाल्याचे चित्र विधानसभेत झाल्याचे पहायला मिळाले. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चे दरम्यान गृह विभागाच्या प्रश्नांवर चर्चेला सुरुवात झाली. त्यावेळी त्यांनी हा भंडाफोड केला. तसेच या कटाचे ११० तासांचे व्हिडिओ रेकॉर्डींग माझ्याकडे आले असून त्यातील निवडक भागाचे रेकॉर्डींग असलेला पेनड्राईन्ह यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे यावेळी त्यांनी सुपुर्द केला.
राज्यातील विरोधकांना संपविण्यासाठी काही नेत्यांची या विशेष सरकारी वकीलाबरोबर बैठक झाली. हा वकील म्हणजे आमच्या सरकारच्या काळात आणि आता तुमच्या सरकारच्या काळात अनेक महत्वाच्या केसेसे यांनी लढविल्या आहेत. या नेत्यांना सरकारी वकील सांगतोय की, गिरीष महाजन याच्यावर भोईटे गटाच्या व्यक्तीला किडनॅप केल्याच्या आरोप करा त्यानंतर महाजन यांच्या विरोधात पोलिसांमध्ये जबाब कसा द्यायचा याबद्दल तो संबधितांना सांगतो. याशिवाय महाजन यांना मोक्का लावायचा असेल तर त्यांच्याकडे ड्रग्ज सापडले पाहिजे. त्यासाठी वकीलांनी त्यांच्या विश्वासातील दोन माणसे तयार केली. यांच्यापैकी एकजण त्यांच्या रूमवर जावून ड्रग्ज ठेवेल असेही या वकीलांने ठरवून टाकले. तसेच त्यासाठी लागणारे पंचही या वकीलाने निश्चित केल्याचे रेकॉर्डींगमध्ये असल्याचे तो एका व्यक्तीशी बोलत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे जरी मंत्री झाले म्हणजे आपणच मंत्री झालो असे त्याचे वक्तव्य असून अनिल देशमुख यांनी आपल्याला २५ लाख रूपयांची रोकड घेवून देण्यासाठी आल्याचा उल्लेख या चव्हाणने केला आहे. ते कोणतीही गोष्ट करायला भीत नव्हते. मात्र आताचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे काहीच करत नाहीत अशी माहितीही या चव्हाण एकाशी बोलताना देत आहे. तसेच मोठ्या साहेबांच्या आदेशानुसार गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आदी नेते रडारवर असल्याची माहितीही या चव्हाणकडून सांगण्यात येत होती असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस अर्थात माझ्या विरोधात केलेले आरोप ही या कटाचाच भाग होता असे सांगत गिरीष महाजन यांच्यावर आरोप झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी माझ्यावरही गोटे यांनी आरोप केले. गोटे यांना या वकीलाने सांगितले की, आरोप असे करा की ते लोकांना खऱे वाटले पाहिजे तसेच जर हे आरोप खोटे निघाले तर मी माझी संपत्ती एखाद्या संस्थेला दान करेन असे आव्हान द्या. पण हे आव्हान देण्यापूर्वी सगळी संपत्ती मुलाच्या नावावर करून टाका असा सल्लाही या वकील महाशयांनी दिल्याचे फडणवीसांनी सांगितले.
या सगळ्या सांगितलेल्या गोष्टींनुसार सगळ्या घटना घडल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी करत पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांच्याबाबत तर सरळ सरळ अंडरवर्ल्डशी संबध असल्याचे उघडकीस आले आहे. ज्या व्यक्तींकडून त्यांनी जमिन खरेदी केली शाह वली सरदार हा सध्या तुरुंगात आहे. तर दाऊदची बहिण हसीना पारकर हीचा फ्रंट मॅन सलिम पटेल हा होता. पारकरने अनेक मालमत्ता या सलिम पटेल याच्या नावावर खरेदी करत असे. हे त्यावेळच्या पोलिस रेकॉर्डमध्ये आहे. तसेच यातील अनेक एका व्यक्तीने नवाब मलिक यांनी दिलेले पैसे हसिना पारकर यांना दिल्याचे आपल्या जबानीत सांगितले आहे. तसेच यावेळी रिमांड ऑर्डरमध्ये असलेली माहितीही त्यांनी यावेळी वाचून दाखविली.
आम्हाला काही वेड लागलेले नाही की कोणाचाही राजीनामा मागायचा आणि कोणा विरोधातही आरोप करायचे. मलिक यांच्या व्यवहारात जर टेरर फंडीग सिध्द झाले तर अवघड आहे अशी शक्यताही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
