Breaking News

म्हाडा पेपर फुटीचे तार मंत्रालयापर्यत तर आरोग्यचे महासंचानलयापर्यत सीबीआय मार्फत चौकशी करा-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम

परीक्षा जाहीर करायच्या आणि त्यानंतर पेपरफुटीने त्या रद्द करायच्या, अशाप्रकारचा सातत्याने काळाकारभार चाललेला आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे देखील आरोग्य विभागाच्या परीक्षा तीन-तीन वेळा रद्द करून, पेपर फुटला आणि त्याची तारं मंत्रालयापर्यंत गेलेली आहेत. त्यामुळे मोठा भ्रष्टाचार या परीक्षांमध्ये सुरू आहे. सामान्य युवकांची फरपट सुरू त्यांचा आक्रोश सुरू आहे. त्यामुळे सरकारने यावर कडक कारवाई केली पाहिजे. सरकारमध्ये कोण दोषी आहे? कुणावर तर दोषारोप झाला पाहिजे. कोणावर दोषारोप देखील होत नाही. मंत्री नामानिराळे मुख्यमंत्री नामानिराळे हे चालणार नसल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देत या सगळ्या पेपरफुटीची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. शिवाय, ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हाडा पेपर फुटीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत शिवाय, परीक्षांमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? असा सवाल करत आरोग्य भरती परीक्षेचा घोळ, पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत, आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ, सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय. नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका अशी विनंती करत दोषींवर कठोर कारवाई कराच पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही? असा सवालही त्यांनी ट्विटरवरून केला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *