Breaking News

फडणवीस म्हणाले, मंत्री मलिकांना पाठीशी घालणार असाल तर सरकार दाऊदसोबत मलिकांच्या राजीनाम्यावरून आज विधानभेत भाजपा पुन्हा गोंधळ

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्‍यावरून विधानसभेत आज भाजपा सदस्‍यांनी जोरदार गदारोळ केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिक यांचा राजीनामा तात्‍काळ घ्‍यावा. मलिक यांना याउपरही सरकार जर पाठिशी घालणार असेल तर हे सरकार दाउदसोबत उभे आहे असाच याचा अर्थ होईल असा इशारा देत त्यामुळे मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावी अशी मागणी ही केली. या मागणीवरून विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी सुरु केल्याने सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाले. त्यामुळे अखेर सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.

विधानसभेचे कामकाज सुरु झाले. प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी भाजपा आमदारांनी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

नवाब मलिक हे सध्या कारागृहात आहेत. मग ते मंत्रीपदावर कसे असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिक यांचा तात्‍काळ राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी केली. मलिक यांना जर सरकार पाठिशी घालणार असेल तर हे सरकार दाउदच्या पाठिशी उभे आहे असा त्‍याचा अर्थ होतो. यावेळी भाजपा आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गदारोळामुळे कामकाज अर्ध्यातासाकरिता तहकूब केले.

आज विधानसभेत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी विरोधकांनी केली. मलिक यांच्या संदर्भात आम्ही बोलतो पण गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या. तात्काळ राजीनाम्याची घोषणा करा, अशी मागणी विरोधकांनी केली.
मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर राज्य सराकर मलिक पाठीशी उभे आहे. त्याचबरोबर ते दाऊदच्या पाठीशी हे सरकार आहे का, असा सवाल उभा राहील, असा सवाल उपस्थित करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर सभागृह गोंधळ झाला. गोंधळानंतर विधानसभेचे कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आले. या गदारोळातच राज्यपालांनी फेरविचारार्थ पाठवलेले महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक २०२१ विधानसभेत पुन्हा एकमताने संमत करण्यात आले.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याप्रश्नी आज भाजपाकडून मुंबईत मोर्चा काढण्यात येणार होता. त्यामुळे विधानसभा सभागृहात भाजपाने गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज अर्धातासासाठी तहकूब केल्यानंतर भाजपाचे सर्व नेते मोर्चाच्या स्थळाकडे निघाले. त्यामुळे सरकारकडून दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

तसेच विरोधकांनी केलेल्या विनंती मुळे काल देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना आजच्या ऐवजी उद्या उत्तर देणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

Check Also

अमित शाह यांच्या आरोपाला अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर, उपकाराची जाणीव ठेवा उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवरील टीकेला दिले उत्तर

सध्या मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उध्दव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिल्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published.