Breaking News

अजित पवार म्हणाले, राणेंचं त्यांनाच लखलाभ नारायण राणे यांच्या टीकेवर अजित पवारांचा सावध पवित्रा

पुणे: प्रतिनिधी

जन आर्शिवाद यात्रेच्या निमित्ताने आज कणकवलीत पोहोचलेल्या नारायण राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने विचारले असता त्यांनी राणे यांनी अजित पवार अजून अज्ञानी असल्याचे वक्तव्य केले. त्याबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया देत त्यांच त्यांनाच लखलाभ असल्याचे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.

मागील दोन दिवसाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

मागील काही दिवसापासून नारायण राणे हे जन आर्शिवाद यात्रेच्या निमित्ताने कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या आणि नारायण राणे यांच्या खात्याकडून राज्याला निधी मिळण्याच्या अनुषंगाने अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, सुक्ष्म, लघु आणि मध्यम विभागाकडून निधी असा कितीसा मिळणार? त्यापेक्षा नितीन गडकरी यांच्या खात्याकडून निधी मिळतो आणि त्यातून कामेही सुरु असल्याचे स्पष्ट केले. तसेच मंत्रीपद मिळाल्यावर फिरणं भागं आहे मात्र धीरानं घेतलं असतं तर हा प्रसंग आला नसता असा खोचक सल्लाही राणे यांना अजित पवार यांनी दिला.

अजित पवारांच्या या वक्तव्याबाबत आज कणकवलीत आलेल्या नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी थेट अजित पवार हे अज्ञानी असल्याचे खळबळजनक विधान केले. त्यावर यासंदर्भात अजित पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, तुम्ही प्रसारमाध्यमे कोणी काही बोलले की लगेच आम्हाला विचारता त्यावर प्रतिक्रिया म्हणून काही बोलतो. मात्र बऱ्याचदा त्या व्यक्तीने नेमके काय बोलले असते ते आम्हाला माहित नसतं. त्यामुळे त्यांच त्यांनाच लखलाभ अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त करत राणे यांच्याविषयी आणखी काही बोलण्याचे त्यांनी टाळले.

Check Also

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा ३९ दिवसात ३९९ फाईल्स क्लिअर ३९९ फाईल्सचा निपटारा जनहिताच्या निर्णयांना वेग

राज्य सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेला वेग आला असून नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत जनहिताचे विविध …

Leave a Reply

Your email address will not be published.