Breaking News

राऊतांच्या खोचक सवालाला फडणवीसांचे उत्तर, ते का घाबरतात? पत्रकार परिषदेतच राऊतांच्या खोचक सवालाला उत्तर

राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या बेकायदेशीर पध्दतीने केलेल्या फोन टॅपिंगचा अहवाल विभागात होता. तो अहवाल आणि त्या अनुषंगाने असलेली तांत्रिक माहिती देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या निदर्शनास आणून देत ती माहिती केंद्रीय गृह विभागाला दिली. ही माहिती फडणवीस यांच्यापर्यत पोहोचली कशी याचा तपास करणाऱ्या मुंबई सायबर पोलिसांनी तब्बल दोन तास जबाब घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊतांना मी सांगू इच्छितो की मला नोटीस आल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन घोषित केले की प्रिव्हिलेज असूनही ते न वापरता चौकशीला जाणार. पण तुम्ही रोज पत्रकार परिषदा घेवून मला का बोलवता असे का विचारत राहतात असे उपरोधिक टोला लगावत राऊतांच्या सवालाला प्रत्युत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत या कथित घोटाळ्यावरून आरोप करत त्या संदर्भातील कागदपत्रे आपण केंद्रीय गृहविभागाला देणार असल्याचे सांगत त्यानुसार त्यांनी ते केंद्रीय गृह सचिवांना नेवून दिले. त्यानंतर यावरून राज्यात मोठेच रणकंदन माजले. तसेच त्यावेळचे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि तत्कालीन राज्याचे अप्पर मुख्य गृह सचिव म्हणून सीताराम कुंटे यांनी यासंदर्भात आपला अहवाल सादर करत राज्य गुप्तचर विभागाने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील माहितीप्रमाणे एकाही पोलिस अधिकाऱ्याची बदली झाली नसल्याचा अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृह विभागाला सादर केला. त्याचबरोबर राज्य सरकारकडून त्या अहवालाची प्रतही प्रसारमाध्यमांना पुरविण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या. तसेच राज्य सरकारने याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्यावर कारवाई होण्यापूर्वीच शुक्ला यांची राज्य गुप्तचर विभागातून केंद्राने हैद्राबाद येथे बदली केली. तर फडणवीस यांनी सदरची तक्रार केंद्रीय गृह सचिवांकडे केलेली असल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून स्वतंत्र सुरू झाला.

याप्रकरणी फडणवीसांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर आज दुपारी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर दोन तास चौकशी देखील करण्यात आली. या चौकशीदरम्यान आपल्याला सहआरोपी करण्याचा प्रयत्न असल्यासारखे प्रश्न विचारल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीसांच्या चौकशीबाबच संजय राऊतांनी केलेल्या ट्वीटवर देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी खोचक शब्दांत निशाणा साधला.

दोन तास चौकशी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन परखड शब्दांमध्ये टीका केली. मला नोटीस पाठवण्यामागचं कारण सभागृहात मी मांडत असलेले विषय आहेत. दाऊदसोबत सरकारच्या मंत्र्यांचं कनेक्शन किंवा विरोधी पक्षाबाबत सरकार करत असलेलं षडयंत्र हे विषय मी काढले. म्हणून अचानक अशी नोटीस मला देण्यात आल्याचा आरोप फडणवीसांनी यावेळी केला.

“संजय राऊतांना मी सांगू इच्छितो की मला नोटीस आल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन घोषित केलं की प्रिव्हिलेज असूनही ते न वापरता चौकशीला जाणार आहे. पण माझा सवाल आहे की संजय राऊतांवर अशी परिस्थिती आल्यावर ते का घाबरतात. ते रोज पत्रकार परिषद घेऊन ‘मला का बोलावता’ असं का विचारत राहतात?” असा उपरोधिक सवाल  करत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०३२ अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान

राज्य शासनाच्या विविध विभागातील नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *