राज्यात संशयातीत बहुमत मिळवत सत्तेत विराजमान होण्याच्या महायुतीच्या स्वप्नांना आता महायुतीतील घटक पक्षांकडून एकमेकांच्या अपेक्षांना मुठमाती आणि भाजपाची अरेरावी सहकार्यांवर लादण्याचा प्रकार करण्यात येत असल्याचे आता हळहळू स्पष्ट आहे. राज्यातील विधानसभा निवडणूकीचे संशयातीत बहुमतानंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्यात एकप्रकारचा सुप्त संघर्ष सुरु झाला. त्यातच आता राज्य सरकार स्थापनेला दिवसेंदिवस उशीर करण्यात येत आहे. त्यातच मागील तोडफोडीच्या महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री पदा एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले. तर भाजपाच्या दृष्टीने महत्वाचे ठरलेल्या गृहमंत्री पद स्वतःकडे ठेवले. आत त्याच गृहमंत्री पदावर मुख्यमंत्री पदा भाजपाला तर गृहमंत्री पद शिंदे यांच्या शिवसेनेला मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांची शिवसेना आणि भाजपामध्ये अंतर्गत सुप्त संघर्ष आता उघड्यावर येत असल्याचे दिसून येत आहे.
संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, मागील सरकारच्या काळात मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. तर भाजपाकडे गृहमंत्री पद होते. त्या धर्तीवर आताच्या संख्याबळानुसार मुख्यमंत्री पद भाजपाकडे राहणार असेल तर गृहमंत्री पद शिवसेनेकडे उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री पद ही नैसर्गिकपणे मिळायला हवा अशी मागणी केली.
त्यावर संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, प्रसार माध्यमांमध्ये वक्तव्य करत सरकार स्थापन होत नाही. किंवा इलेक्ट्रीक माध्यमांसमोर एखादं वक्तव्य केल्याने राज्यातील अशा प्रकारचं वक्तव्य करून चर्चा होत नाही. जे काही निर्णय होईल तो काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे एकत्र बसून चर्चा करतील आणि त्यास भाजपाचं केंद्रीय नेतृत्व त्याला मान्यता देईल ही खूप सोपी गोष्ट आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांसमोर कोणी काही वक्तव्य केल्याने किंवा इतर कोणी वक्तव्य केल्याने सरकार स्थापन होत नाही. आणि सरकार स्थापनेच्या चर्चा होत नाहीत असेही यावेळी सांगितले.
तर संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यांना जेव्हाही एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल त्यावेळी ते दरेगावला जात असतात. ते त्यांच्या आवडीचं ठिकाण आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, सरकार स्थापनेत कोणताही अडसर आणणार नाही. भाजपाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्यास आमचा पक्ष बांधील राहिल. मात्र वास्तविक पाहता मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना नाराज असल्याची चर्चाच अधिक ऐकायला मिळत आहे.