Breaking News

फडणवीसांच्या टीकेवर संजय राऊत म्हणाले की, पंजाबमध्ये भाजपाची काय अवस्था भाजपाच्या नोटांपुढे आम्ही कमी केलो

भाजपाला शह देण्यासाठी आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत दिली.परंतु गतवेळीपेक्षा यावेळी गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असून, भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. निकालानंतर गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वात मोठा पक्ष ठरेल म्हणून काँग्रेसने कालच पत्र राजपाल्यांना पत्र दिले. तर शिवसेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रित मते जर बघितली तर ती नोटापेक्षाही कमी मते मिळाल्याची टीका केली. त्यावर आता शिवसेनेकडून संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले असून भाजपाने ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापुढे आम्ही कमी पडलो, हे खरंय. पंजाबमध्ये भाजपाची या पेक्षा वेगळी अवस्था नसल्याचा उपरोधिक टोला राऊत यांनी फडणवीस यांना लगावला.

पंजाबमध्ये एक राष्ट्रीय पक्ष मोदी आणि शाह यांचाच चेहरा तरी पंजाबमध्ये भाजपाला, कोणत्या प्रकारचं यश मिळाले? याचे त्यांनी उत्तर द्यावे. नोटापेक्षा कमी मते मिळाली हे खरंय कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या. तरीही आम्ही उत्तर प्रदेश आणि गोव्यात आमच्या पद्धतीने लढलो. ही लढाई सुरूच राहील, कोणत्याही निवडणुकीत विजय आणि पराजय हा अंतिम नसतो ती सुरुवात असते. भाजपाचा जो विजय आहे तो त्यांच्या उत्कृष्ट निवडणूक व्यवस्थापनाचाही विजय आहे, असं मी मानतो असेही ते म्हणाले.

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी विजय झाला आहे. राजकारणात, लोकशाहीत ज्यांचा विजय होतो, त्यांचे अभिनंदन करण्याची परंपरा आपल्या देशात आहे. त्यामुळे ज्या ज्या राज्यांमध्ये ज्या पक्षांनी विजय मिळाला आहे, मी त्यांचे पक्षाच्यावतीने अभिनंदन करतो. पंजाबमध्ये काँग्रेस जो सर्वात मोठा पक्ष होता, त्यांचा अतिशय वाईट पद्धतीने पराभव झाला आहे. गोवा आणि उत्तराखंडमध्ये विजयी होण्याची त्यांना अपेक्षा होती, मात्र पराभव झाला. अखिलेश यादव आणि त्यांच्या आघाडीची चांगली कामगिरी राहील अशी अपेक्षा होती. मी कामगिरीबाबत बोलत आहे, मात्र अपेक्षे पेक्षा कमी कामगिरी झाल्याची दिसत आहे. जिथे जिथे लोकाना एक पर्याय मिळाला आहे, तिथे लोकानी पर्याय निवडला आहे. जसं की पंजाबमध्ये पर्याय मिळाला, दिल्लीहून एक पार्टी तिथे गेली केजरीवाल यांची, दिल्लीत केजरीवाल यांनी जे काम केलं होतं, त्याचाही फायदा झाला. काँग्रेसचं निवडणूक व्यवस्थापन पंजाबमध्ये ठीक राहीलं नसल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. पण त्यांना यश मिळू शकले नाही, याचा अर्थ लढाई संपली असे होत नाही. शिवसेनेच्या बाबतीत आम्ही जिथं जिथं निवडणूक लढलो, ती आमची सुरुवात आहे. भविष्यात न थांबता आम्ही काम करत राहू. अर्थात या निकालामुळे जरी भाजपा खूप मोठा विजय प्राप्त झाला असला तरी, त्यांनी विजय पचवायला शिकले पाहिजे. पराभव पचवणे सोपं असते अनेकदा काही लोकांना विजय पचवता येत नाही. विजयाचं अजीर्ण होतं आणि अजीर्ण झाला की त्रास होतो. माझी अपेक्षा आहे हा लोकानी दिलेला जो विजय आहे, तो तुम्ही पचवा आणि पुन्हा एकदा त्या राज्यांमध्ये सूडाने राज्यकारभार न करता, लोकशाही मार्गाने काम करा, देशाचं आणि राज्याचं हीत पाहा एवढंच मी सांगतो असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दिल्लीत आता संसद सुरू होईल, तेव्हा आम्ही एकत्र भेटू काही चर्चा होतील. उत्तर प्रदेशमध्ये जर चांगल्याप्रकारे विरोधी पक्षांचं व्यवस्थापन झालं असतं, विशेषतः काँग्रेसला बरोबर घ्यावं अशी सगळ्यांची अपेक्षा होती. ते जर घेतलं असतं अखिलेश यादव यांनी, तर कदाचित त्यांची कामगिरी अधिक चांगली दिसली असती. कारण, प्रियंका गांधी यांनी ज्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं होत्या त्याचा फायदा विरोधी पक्षांच्या आघाडीला नक्कीच झाला असता. काँग्रेसला यापुढे त्यांच्या धोरणात बदल करावा लागेल. आम्ही गोव्यात एकत्र येऊन लढण्याचा खूप प्रयत्न केला, नक्कीच फायदा झाला असता असेही ते म्हणाले.

Check Also

अतुल लोंढे यांची मागणी,… एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा

लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *