Breaking News

राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून पंतप्रधानांना महागाईचं रिटर्न गिफ्ट महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात महागाई विरोधात आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी

देशातील आपल्या सर्व भगिनींना मोदीसरकारने गॅस सिलेंडरचे भाव २५ रुपयांनी वाढवत रक्षाबंधनाची ओवाळणी दिली होती याच प्रेमाखातर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पंतप्रधानांना रक्षाबंधनाचं आणि महागाईचं रिटर्न गिफ्ट म्हणून शेणाच्या गोवऱ्या आज पाठवत पुणे येथे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाची सुरुवात पुणे येथे प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

अच्छे दिनाची खोटी स्वप्न दाखवून जनतेच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या या भावाला महागाईचे प्रतिक म्हणून शेणाच्या गोवऱ्या महिलांनी राज्यभरातून भेट म्हणून पाठवल्या आहेत. महिलांच्या स्वास्थ्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या पंतप्रधानांनी उज्वला गॅस योजना आणली, परंतु फक्त योजना आणून पोट भरत नसतं. दर १५ दिवसांनी स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरचा दर वाढतोय. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्हा ‘चुलीकडे चला’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे असा आरोपही रुपाली चाकणकर यांनी केला.

सात वर्षांत गॅस सिलेंडरची दरवाढ दुप्पटीने वाढली आहे. कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य माणूस आर्थिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी दर पंधरा दिवसांनी गॅस, पेट्रोल – डिझेल दरवाढ करून केंद्र सरकार सर्वसामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, आज देशभरातील महिला भगिनी आपल्याला विचारतात,”क्या हुआ आपका वादा, महंगाईसे घर बेचना पडा आधा” असा टोलाही त्यांनी  मोदींना लगावला.

Check Also

काँग्रेसचे प्रत्युत्तर; देवेंद्रजी, हेराल्ड प्रकरणी व्यवहारच झाला नाही तर … घोटाळा २ हजार कोटींचा, का ५ हजार कोटींचा हे आधी ठरवा- अतुल लोंढे

ईडीने राहुल गांधी यांना चौकशीसाठी आज पाचारण केल्यानंतर ईडीच्या या कारवाईच्या विरोधात देशभरात आंदोलन करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published.