Breaking News

शरद पवार यांचा टोला, संख्याबळ आहे तर मग तिकडे का?…तर निवडणूका होतील राष्ट्रपती राजवट लागू केल्यास त्यांना काय फायदा होणार

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे याचिका दाखल केली. त्यानंतर आजच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना रूग्णालयतून घरी सोडण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे ही आज दिल्लीत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडातील पहिला अंक संपून दुसऱ्या अंकाला सुरुवात झाल्याचे चित्र निर्माण झालेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले. शरद पवार म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे आज किंवा उद्या शिवसेना पावले उचलणार आहे. मात्र जर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे पुरेसे संख्याबळ आहे तर मग ते तिकडे का आहेत? असा सवाल करत टोला लगावला.

त्यामुळे शिवसेना आपल्या बंडखोरांना परत आणण्यासाठी जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नवी दिल्लीत विरोधकांच्यावतीने राष्ट्रपती पदासाठी जाहिर केलेले उमेदवार यशवंत सिंन्हा यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरीता शरद पवार हे नवी दिल्ली येथे आले. त्यानंतर त्यांच्या औरंगजेब रोडवरील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जवळपास ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेंना शरद पवारांनी निशाणा साधत म्हणाले की, त्यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्येचा ते दावा करत आहेत. आम्हाला आश्चर्य वाटतं की त्यांच्याकडे जर नंबर आहेत, तर ते तिकडे काय करतायत? मुंबईत येऊन राज्यपाल किंवा कुठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये सिद्ध करून टाका की तुमच्याकडे जी सदस्यसंख्या आहे.

राज्यात सत्ता परिवर्तनासाठीच हा सगळा खटाटोप सुरू असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, शिवसेनेचा एक गट आसाममध्ये आहे. त्यांच्यावतीने जी विधानं आली, त्यातून एक स्पष्ट होतंय की त्यांना सत्तापरीवर्तन हवंय. त्यासाठी त्यांचा हा सगळा प्रयत्न आहे. पण गेलेले लोक परत आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल होईल असा विश्वास व्यक्त करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे आघाडीला पूर्ण पाठिंबा देण्याची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, ज्या लोकांनी बंडखोरी केलीये, त्यांची इच्छा आहे की इथे दुसरं सरकार यावं. राष्ट्रपती राजवट लागू केली, तर त्यांनी या लोकांना इकडून तिकडे करण्यासाठी जी मेहनत केली, ती वाया जाईल. त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे माझा असा अंदाज आहे की राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही. पण जर राष्ट्रपती राजवट लागू झाली, तर निवडणुका होतील.

राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तीन पक्षांची महाविकास आघाडी अशीच कायम राहील का? असा प्रश्न एका महिला पत्रकाराने विचारला असता ते म्हणाले की, आज तरी आमची आघाडी आहे, आघाडीला आमचा पाठिंबा आहे. आणि ही आघाडी पुढे कायम ठेवण्याची आमची इच्छा आहे.

बंडखोरांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्याने साधण्यात येत असलेल्या टीकेवर ते शरद पवार म्हणाले की, शिंदे आणि त्यांचे सहकारी अडीच वर्ष सरकारमध्ये होते. या काळात त्यांना राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांचा त्रास झाला नाही. आजच का त्रास होतोय? हे फक्त कारण पुढे केलं जात आहे. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांनी आमच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *