भाजपाबद्दल कालच्या भाषणात एकही शब्द आलेला नाही. त्यांच्यावर भाजपाने कदाचित काही जबाबदारी दिलेली असावी त्याचा प्रत्यय कालच्या सभेत आला असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरेंवर करत महागाई, बेरोजगारी एवढी वाढलेली असताना जर एखादा राजकीय नेता आपल्या सभेत एक शब्द बोलत नाही, म्हणजे काय समजायचं? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
अजित पवार यांच्यावर ईडीची कारवाई होते आणि सुप्रिया सुळे यांच्यावर होत नाही. हा आरोप पोरकट असल्याचे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतानाच अजित पवार आणि मी वेगळा नाही. आमचे कुटुंब एकच आहेत, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी दिली.
चमत्कारीक नेतृत्वाने एका व्यक्तीबाबत द्वेष निर्माण करण्याचे काम केले. यामध्ये एसटी कामगारांना दोषी धरता येणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगत अॅड गुणरत्न सदावर्ते यांचे नाव न घेता चमत्कारीक नेतृत्व असल्याची टीका केली.
विक्रांतसाठी पैसे गोळा केले हे दिसते आहे. पैसे गोळा केले तर त्याचा विनियोग काय केला? माझ्या वाचनात आले की ते पक्षाकडे जमा केले. भावनेला हात घालून पैसे गोळा केले. मग तो एक रुपया असो किंवा अकरा हजार रुपये ते पक्षाकडे का दिले. ते पैसे सैन्यदल किंवा नौदलला देता आले असते. माझ्या मते हे आक्षेपार्ह आहे अशी भूमिकाही शरद पवार यांनी किरीट सोमय्या यांचे नाव न घेता टीका केली.
त्याचबरोबर आमचा संपणारा पक्ष नसून संपवणारा पक्ष आहे, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी काल ठाण्यातील सभेत केले होते. त्या वाक्याचा धागा पकडत पवार म्हणाले की, ते म्हणतात ते खरे आहे. संपवणारा पक्ष याची नोंद महाराष्ट्रातील मतदारांनी योग्य घेतली व खरे दाखवून दिले की, त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे. त्यांच्या सभा मोठ्या होतात सभेला लोक जातात. त्या सभेत शिवराळ भाषा असो की नकला यातून मात्र लोकांची करमणूक होते असा खोचक टीका त्यांनी यावेळी केली.
एखादी व्यक्ती वर्ष – सहा महिन्यात एखादे वक्तव्य करत असेल तर ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पण पत्रकार विचारत आहेत, म्हणून त्यावर मत व्यक्त करतोय असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
