Breaking News

जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला, …आता राज्य करायला उसंत मिळेल भेट देण्याच्या उपक्रमावरून लगावला टोला

सर्व गणपतींना भेट देण्याचा उपक्रम आता बाप्पाच्या जाण्यानंतर महाराष्ट्रात पूर्ण होणार असून आता राज्य करायला थोडी उसंत मिळेल असा टोला लगावतानाच राज्यात संकटात असलेल्या बळीराजाला मदत करायला हात सरसावतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त केली.

जयंत पाटील यांच्या घरगुती गणेशाचे आज विसर्जन झाले त्यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला.

या दहा दिवसात आणि त्याअगोदर झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बळीराजाला सरकारची मदत गेलेली नाही तो आजही मदतीच्या अपेक्षेत आहे असेही ते म्हणाले. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा झाल्या मात्र आजही महाराष्ट्रातील शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या शेतकऱ्यांना अथवा शेतमजुरांना मदत मिळालेली नाही म्हणून आता किमान उसंत मिळाली असेल तर बळीराजाला मदत करायला पुढे या असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.

दरम्यान, दही हंडीनंतर गणेशोत्सवाला सुरुवात झाली. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने सुरुवातील भाजपा नेत्यांच्या घरी जावून गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी जावून तेथेही दर्शन घेतले. इतकेच नव्हे तर राज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा खाजगी दौरा असताना त्यातही सहभागी होत लालबाग येथील गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर पुणे येथील विविध गणपती मंडळांचे दर्शन घेत त्यात अख्खा एक दिवस घालविला. तेथून परतल्यानंतर पुन्हा लालबाग येथील गणपतीच्या दर्शनासाठी सहकुटुंब गेले. त्यांच्या या गणपती दर्शन यात्रेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली.

Check Also

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *