Breaking News

टिपू सुलतान वादावरून मलिक म्हणाले, दरेकर हे मजूर सोसायटीचे कामकाज नाही चुकीचं बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम

मालवणी येथील क्रिडा संकुलास टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून भाजपा नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाला साधल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी दरेकरांच्या टिकेला प्रतित्युर देत प्रविण दरेकर हे मजूर सोसायटीचे कामकाज नाही असा उपरोधिक टोला लगावला.

टिपू सुलतान इंग्रजासमोर शरण गेला नाही. जी व्यक्ती इंग्रजासमोर झुकली नाही त्यांच्या नावावर वाद उभा केला जात आहे हे राजकारण असून प्रविण दरेकर हे मजुर सोसायटीचे कामकाज नाही. इतिहास समजना आप के बस की बात नही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

मी टिपू सुलतान यांच्याविषयी चुकीचं बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा… राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करा अशी खोचक सूचनाही त्यांनी यावेळी भाजपाला केली.

दरम्यान ज्याप्रकारे वाद निर्माण केला जात आहे… वातावरण दुषित केले जात त्यावरुन टीपू सुलतान यांचा अपमान केला जात आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे नेते येदुराप्पा हे टिपू सुलतान यांची जयंती साजरी करत होते. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी निर्णय बदलल्याची आठवण करून देत राष्ट्रपती कोविंद यांनी टिपू सुलतान यांना धाडसी शहीदाचा दर्जा देताना देश त्यांना विसरु शकत नाही असे भाषण केले होते याची आठवणही भाजपाला त्यांनी करून दिली.

विरोधई पक्षनेते प्रविण दरेकर नेमके काय म्हणाले? 

नवाब मलिक मुस्लीम असल्याने टिपू सुलतानाचं कौतुक

मंत्री नवाब मलिक मुस्लीम असल्याने ते टिपू सुलतानाचं कौतुक करणारच. त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टे आहेत, हिंदू द्वेष हा त्यांच्या रक्तात आणि नसानसांत भरलाय, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, काँग्रेसला देशप्रेम आणि राष्ट्रवाद यापेक्षा सत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे मंत्री अस्लम शेख यांच्याकडून मुस्लीम समाजाचे लांगुलचालन सुरु आहे. तर शिवसेनेची या सगळ्यातील भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते मालाडमध्ये रस्त्यावर उतरुन मैदानाला टिपू सुलतानाचे नाव देण्यास विरोध करतात. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते महापालिकेने असा निर्णय घेतलाच नसल्याचे म्हणतात. पण पालिकेने नाव दिल्याशिवाय अस्लम शेख मैदानाचं लोकार्पण कसं करतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Check Also

अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द

देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *