Breaking News

देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम
लोकशाही आहे अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळलं पाहिजे, पवारसाहेबांचे राजकारण संपले आहे असे फडणवीस बोलले होते. त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टिका करत आहेत… देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांना पंतप्रधान पदी बसलेले पाहायचेय अशी मनिषा व्यक्त केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर आणि त्यांच्या संभाव्य पंतप्रधान होण्यावरून टीका करत त्यांनी स्वप्न पहावीत २०२४ मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार अशी आशाही व्यक्त केली. फडणवीसांच्या या टीकेला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले.
जेव्हा देवेंद्र फडणवीस तुम्ही शाळेत होतात, त्यावेळी १९८४ साली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाची संख्या दोनवर गेली होती. तुमचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात होते हे विसरला आहात असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
ही लोकशाही आहे अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळलं पाहिजे. पवारसाहेब किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने पवारसाहेब पंतप्रधान होतील असा कुठलाही दावा केलेला नाही. उलट पवारसाहेब देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी काम करत आहेत. विरोधकांच्या एकीमुळे मोदीसरकार सत्तेबाहेर जाईल असेही ते म्हणाले.
पवारांच्या अभिष्यचिंतन सोहळ्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही महाराष्ट्रात ज्या प्रमाणे गोष्टी करत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तसे पवार साहेबांनी काही तरी करावे आणि केंद्रातील सरकार घालवून टाकावे अशी अपेक्षा शरद पवारांकडून व्यक्त केली होती.

Check Also

भाजपा आमदार नितेश राणेंना उच्च न्यायालयाकडून धक्का आणि दिलासा २७ जानेवारी पर्यत अटक करता येणार नाही

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय मत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *