Breaking News

वानखेडे दिल्लीला गेले तरी संपूर्ण प्रकरणाचा छडा लागेपर्यंत लढा सुरुच राहणार वानखेडेला एनसीबीमधून बदलण्यात आले हा केंद्रसरकारने योग्य निर्णय घेतला - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम
समीर वानखेडे यांना एनसीबीमधून बदलण्यात आले आहे, हा केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत ते जरी बदलून गेलेले असले तरी संपूर्ण प्रकरणाचा छडा लागेपर्यंत आपला लढा सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एनसीबीमध्ये आल्यानंतर फर्जीवाडा करुन अनेक चांगल्या लोकांना चुकीच्या पद्धतीने जेलमध्ये टाकले. नोकरी मिळवण्यासाठी फर्जी प्रमाणपत्र घेऊन नोकरी घेतली. कमी वयात बारचे लायसन्स घेतले ही सगळी प्रकरणे उघड केली. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. याशिवाय खंडणीच्या प्रकरणात दोन – दोन एसआयटी तपास करत आहेत. दिल्ली विजिलिन्स समितीकडेही तक्रार केल्यानंतर त्यांचा रिप्लाय आला आहे. प्रथमदर्शनी वानखेडेने सर्व्हिस कोडचे उल्लंघन केले आहे हे स्पष्ट होते आहे. या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करून हा विषय धसास लावणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
समीर वानखेडेला मुदतवाढ मिळावी म्हणून दिल्लीत लॉबिंग करण्यात येत होते हे कालच जाहीर केले होते. त्यानंतर रात्रीच वानखेडेला बदलण्यात आल्याचे समजले. लॉबिंग करणार्‍या व्यक्तीने माघार घेतली हे यावरून स्पष्ट होते आहे. समजा मुदतवाढ दिली असती तर संपूर्ण माहिती घेऊन प्रकरण उघड करणार होतो असेही त्यांनी सांगितले.
आर्यन खान प्रकरणात दोन्ही एसआयटी तपास करत आहेत. त्यात काही अडचण येत असेल तर त्याचीही विचारणा करण्यात येईल. प्रभाकर साहीलने प्रतिज्ञापत्राद्वारे सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे यंत्रणा त्या घटनेचा योग्य तो तपास करुन कारवाई करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जाता – जाता माझ्याबाबतीत वेगळा प्रकार घडवण्याचा प्रकार होता. पोलिसांकडे माझ्या विरोधात तक्रार मेलद्वारे केली असेल तर माझ्यासह चौकशी करा किंवा माझ्याविरोधात कुठल्या अधिकार्‍याने तक्रार करण्यास कुणाला प्रोत्साहित केले असेल तर त्यावर मुंबई पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे ज्यापध्दतीने गौप्यस्फोट करत आहे त्यावरून हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे… तीन कृषी कायदे वेळेवर मागे न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांचे वर्षभर हे आंदोलन झाले. लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांचे हत्याकांड घडवले त्याविरोधात आता चार्जशीट दाखल झाली आहे. मात्र मोदी शेतकऱ्यांबाबत अशाप्रकारचे विधान करत असतील तर हे योग्य नाही आणि हे सत्य असेल तर जनता मोदींना माफ करणार नाही असेही त्यांनी स्पष्टपणे बजावले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *