Breaking News

“त्या” वक्तव्यावरून प्रविण दरेकरांना राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकरांचा इशारा थोबाड आणि गाल रंगवू शकतो, माफी मागा

मुंबई : प्रतिनिधी

शिरूर येथील एका कार्यक्रमात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करायच्या नादात जीभ घसरली. येथील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादीला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष असल्याची टीका करत पायरी सोडल्याचे दिसून येते त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त करत दरेकर माफी मागा. नाही तर महिलांचा अपमान करणाऱ्यांचं आम्ही थोबाड आणि गाल रंगवू, असा इशारा रुपाली दिला.

प्रविण दरेकर काल शिरुर येथे राजे उमाजी नाईक यांच्या २३०व्या जयंती निमित्ताने जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे होते. यावेळी दरेकर यांनी हे विधान केलं. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला.

दरेकर यांच्या या विधानावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला. दरेकर यांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा. नाही तर आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा दिला.

प्रविणजी दरेकर, तुम्ही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहात. हे सभागृह वरिष्ठ आणि ज्येष्ठांचं सभागृह आहे. परंतु आपण आज ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं यावरून तुमचा वैचारिकतेशी अभ्यासाशी काहीही संबंध नसल्याचं दिसून येतं. तुम्ही जे वक्तव्य केलं ते उच्चारताना मला लाज आणि संकोच वाटतो. पण घेणं नाईलाज आहे. तुम्ही म्हणालात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे. तुम्ही महिलांबद्दल असे बोलत आहात. सातत्याने महिलांना दुय्यम वागणूक देणं ही तुमची परंपरा आहे. आपल्या बोलण्यातून जी घाण टपकते. त्यातून तुमच्या वैचारिक दारिद्रय दिसून येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिले. तुमच्या पक्षातील काही महिला आम्ही महिलांच्या किती कैवारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आज मला त्यांची कीव वाटते. ज्या पक्षाचा असला विचार आहे, अशा पक्षात या महिला काम करत आहेत. तुमच्या बोलण्यावरून तुमच्या पक्षाची संस्कृतीही दिसून येत असल्याचे त्या म्हणाल्या.

Check Also

उध्दव ठाकरेंचे नाव न घेता फडणवीस म्हणाले, त्या स्थगितीमुळे १० हजार कोटी वाढले मुंबई मेट्रो मार्गिका-३ च्या सुधारित प्रस्तावास मान्यता

बहुचर्चित कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्गासाठी आरे येथे कारशेड उभे करण्याच्या कामास तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published.