Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चाकणकर म्हणाल्या, पडळकर मानसिक नैराश्य… विकृत मानसिकतेतून ते वक्तव्य केल्याची टीका

काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस हे १०-२० शरद पवार खिशात घालून फिरतात अशी टीका करत पवार कुटुंबियांवर टीकेची झोड उठविली. पडळकरांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, पडळकर यांना मानसिक नैराश्य आले असून त्याच नैराश्यातून ते विकृत वक्तव्य करत असल्याची खोचक टीका केली.

दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि हे सरकार अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. कोरोनासारख्या महामारीत राज्याच्या पालकत्वाची जबाबदारी कशी निभवावी हे महाविकास आघाडी सरकारने दाखवून दिले. महाराष्ट्र आणि जनतेची काळजी घेत असताना महाविकास आघाडीसोबत राज्यातील जनताही उभी राहिली. विरोधकांना आता हे सहन होत नाही. त्यांच्याकडे टीका करण्यासाठी विषय नाहीत. कोणतेही पुरावे हातात नसताना केवळ महाविकास आघाडी सरकारवर टीका करायची आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, हा एककलमी कार्यक्रम मागील दोन वर्षांपासून सुरु असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करत आहेत, याचा अर्थ हे त्यांच्या मानसिक नैराश्याचं प्रतिक आहे. त्यांना किती नैराश्य आलेल आहे, हे त्यांच्या सततच्या वक्तव्यातून दिसून येत असल्याचे प्रत्युत्तरही त्यांनी भाजपाला दिले.

काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करताना म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ आहेत मात्र श्रेष्ठ नाहीत. देवेंद्र फडणवीस हे दहा-वीस पवार खिशात घालून फिरतात. त्यांचा विषय असा आहे की, काहीही केले, तर मीच केले. माझ्यापेक्षा कोण पुढे जाता कामा नये, अशी त्यांची वृत्ती आहे. पण, देवेंद्रजी असे दहा-वीस शरद पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा किती तरी प्रगल्भ नेतृत्व देवेंद्रजींचे आहे. फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधातली भूमिका ही शरदचंद्र पवारांची आहे. तसेल विषय सोडून त्यांच्या पुढचे नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्रजींच्या नेतृत्वात आहे अशी तुलनात्मक टीका पवारांवर केली होती.

Check Also

भाजपा खासदार डॉ अनिल बोंडे, नवनीत राणा यांच्या लव्ह जिहादचा बार फुसका मुलीनेच दिला जबाब असा कोणताही प्रकार नाही

अमरावतीतील धारणी येथील एका हिंदू मुलीला मुस्लिम तरूणाने फुस लावून पळवून लावले. तसेच त्या मुलीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published.