Breaking News

अजित पवार म्हणाले; संभाजी राजांच्या स्मारकाला स्थगिती, ते काय घरचं काम आहे… विकास कामाला स्थगिती देण्यावरून साधला निशाणा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जावून शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने मंजूरी दिलेल्या निधी वाटपासह विकास कामांच्या अमंलबजावणी दिली. विशेष म्हणजे ही स्थगिती देताना २०२१ या वर्षाच्या सुरुवातीपर्यतच्या कामांना स्थगिती दिली. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलीच टीका केली.

राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, जी काही विकास कामे सुरु होती, त्यासाठी जो काही निधी देण्यात आला त्या सर्वांना स्थगिती दिली. ती कामे काय कुणाच्या घरची होती की कोण्या आमदाराच्या घरातील आहेत का? अशी खोचक सवाल करत म्हणाले की, शिंदे सरकारकडून वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी मंजूर झालेल्या निधीला या सरकारने स्थगिती दिली, असा आरोप केला.

छत्रपती संभाजी महाराजांकडे एक शौर्य गाजवणारा राजा म्हणून आपण बघतो. स्वराज्यरक्षक म्हणून पाहतो. महाविकास आघाडी सरकारने वढू-तुळापूर येथे त्यांचे स्मारक बनवण्याचे ठरवले होते. या स्मारकासाठी महाविकास आघाडी सरकारने २६३ कोटी रूपयांचा निधीही मंजूर केला. त्याचा २६३ कोटींचा आराखडादेखील तयार झाला होता. मात्र, हा निधी राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला. तसेच शाहू महाराजांच्या स्मारकासाठीही निधी दिला होता, तो देखील रद्द करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिंदे फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळातली अनेक मंजूर विकासकामे स्तगित करण्याचे काम सुरु आहे. ही कामे काही आमदारांच्या घरातली नव्हती. ही विकासाची कामे होती, इतकं खालच्या पातळीचे राजकारण महाराष्ट्रात कधीही झाले नव्हते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

बरं हे स्थगिती एकवेळ समजू मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत मंत्री म्हणून काम केलेले आहे. तसेच अनेक कामांना त्यांनीही मंजूरी दिली. तरीही त्यांनी या साऱ्या कामांना स्थगिती दिल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

यावेळी तिरूपती बालाजीला जाणाऱ्या गाडीला गाडीत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याने पुढे जावू दिले नाही या घटनेबाबत विचारले असता त्यांनी यावरून संताप व्यक्त करत म्हणाले, यासंदर्भात मी मिलिंद नार्वेकर यांना पत्र लिहून कळविले आहे. तसेच ते देवस्थानच्या समितीवर ट्रस्टी आहेत. त्यामुळे त्या ट्रस्टींशी ते बोलतील. मात्र त्यांची आई वारल्यामुळे ते दु:खात आहेत. तसेच त्यांच्या आईचा १३ वा दिवस झाल्यानंतर ते बोलतील असेही सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *