Breaking News

मनसेच्या टीझरला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर, जडे इतनी कमजोर नही की…. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासेंचा शायरीतून इशारा

गुढी पाढव्याच्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवित राज्यातील जातीयतेला शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार ठरविले. त्यानंतर शरद पवार यांनी सूचक शब्दात राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले. तसेच इतर राजकिय पक्षांच्या नेत्यांनीही राज ठाकरेंवर चांगलीच टीकेची झोड उठविली. या टीकेला राज ठाकरे हे उत्तर देण्यासाठी नियोजित ९ एप्रिल रोजी जाहीर सभा घेणार होते. परंतु आता ही जाहीर सभा १२ एप्रिल रोजी ठाण्यात होणार असताना राज ठाकरे यांच्या भाषणाचा एक टीझर मनसेने प्रकाशिक केला असून या टीझरमध्ये करारा जवाब मिलेगा असे सांगण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर देत, जडे इतनी कमजोर नही है की इन हादसों से हिल जाए असा सूचक शायरीतून इशारा दिला. त्यामुळे राज ठाकरे यांच्या १२ एप्रिलच्या सभेनंतर मोठी राजकिय घमासान होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

सिंगल प्वाइंट एजेंडा है कि कैसे हमारी एकता तोड़े असा राज ठाकरे यांचा असल्याचे सांगत अरे भाइयों ‘राष्ट्रवादी’ की जड़े इतनी कमजोर नहीं है कि इन हादसों से हिल जाए असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
१२ एप्रिलला मनसेची सभा ठाण्यात होत आहे. यावेळी मनसेने ‘करारा जवाब मिलेगा’ असा एक व्हिडिओ टीजरच्या रुपात शेअर करताना त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या भाषणाचा उल्लेख केला आहे. मनसेच्या या टीजरमधील याच ‘करारा जवाब’ ला महेश तपासे यांनी त्याच्या पुढच्या लाईनने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
बेबुनियाद आरोप, मनगढ़त स्कैंडलस और खोद खोद के कीचड़ उछाल रहे हैं हमपर असेही त्यांनी आपल्या ट्विटमधून मनसेवर निशाणा साधला.
दरम्यान मनसेचा अजेंडा महाराष्ट्राच्या जनतेला सर्वश्रुत आहे. गुढीपाडव्यानंतर परत एकदा मनोरंजनासाठी आम्ही तयार आहोत असा उपरोधिक टोलाही महेश तपासे यांनी मनसेला लगावला.

भाजपच्या एका नेत्याने सांगितले की,”हिंदी को इंग्लिश के एक विकल्प के तौर पर लिया जाना चाहिए” मनसेने एक पाऊल पुढे टाकून आदरपूर्वक आपली मातृभाषा सोडून हिंदी मध्ये ‘टीझर’ काढला. आता पुढचे भाषण पण यांचे नेते हिंदी मध्ये करणार काय? असा खोचक सवालही राष्ट्रवादीच्या क्लाईड कॅस्ट्रो यांनी मनसेला केला.

 

Check Also

बाळासाहेब थोरात म्हणाले, २४ तासात भाजपाचे तीन नेते राज यांना भेटले यावरून संकेत स्पष्ट… पूर्वीचे लाव रे व्हिडीओ म्हणणारे राज ठाकरे खरे होते

जवळपास एक वर्षापासून भाजपा आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या ज‌वळकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपाची युती …

Leave a Reply

Your email address will not be published.