Breaking News

कॉर्डिलिया क्रुजप्रकरणी एनसीबीची मोठी कबुलीः आर्यन खानसह त्यांच्या विरोधात पुरावा नाही व्हॉट्सअॅप चॅट पुरावा होवू शकत नाही

बॉलीवूड बादशाह शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या विरोधात ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून वादग्रस्त एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांने गुन्हा नोंदवित कारवाई केली. तसेच याप्रकरणी आर्यन खान हा आठवड्यापेक्षा जास्त कालावधी तुरूंगात रहावे लागले. मात्र याप्रकरणी आता आर्यन खान प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याची स्पष्टोक्ती एनसीबीचे प्रमुख एस.एन.प्रधान यांनी दिली.

वाचा

कॉर्डिलिया क्रुजवर माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी कारवाई करत आर्यन खान याच्यासह चार जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आक्षेपार्ह गोष्टी आढळल्याचा आरोप करत आर्यन खान याच्या मित्राकडे ड्रग्ज सापडल्याचा गुन्हाही दाखल केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी शाहरूख खान याच्याकडून खंडणी उकळण्यासाठीच हा बनाव रचल्याचा आरोप करत समीर वानखेडे याच्या कारवाई विरोधात आवाज उठविला होता. त्यावेळी या प्रकरणातील प्रमुख पंच साक्षिदार असलेल्या प्रभाकर साईल यांनेही या कारवाईचा कट कसा रचला गेला याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता.

वाचा

त्यानंतर याप्रकरणात शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिच्याकडून ५० लाख रूपये घेतल्याचेही उघडकीस आले. तसेच याप्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी गोसावी नामक व्यक्तीने खंडणी वसुलीसाठी प्रयत्न केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर याप्रकरणाशी संबधित अनेक गोष्टी बाहेर आल्यानंतर अखेर एनसीबीनेच या प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून तो दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविला. त्यानंतर वानखेडे याची बदलीही पुन्हा दिल्ली येथील मुख्यालयात करण्यात आली.

त्यानंतर यासंपूर्ण आर्यन खान प्रकरणाचा तपास एनसीबीनेच केल्यानंतर कॉर्डिलिया क्रुजवर केलेल्या कारवाईत जे व्हॉट्सअॅप चॅटचा उल्लेख करण्यात आला. तो चॅट ग्राह्य धरता येत नसल्याचे एस.एन प्रधान यांनी सांगितले.
आजकाल व्हॉट्सअॅप कोणी काहीही लिहिते. जोपर्यंत त्या चॅटनुसार एखाद्याकडून प्रत्यक्ष कृती केली जात नाही. तोपर्यंत तो गुन्हा मानता येत नाही. तसेच त्याचा भक्कम पुरावाही मानता येत नाही. तसेच तो संपूर्ण प्रकार संशयातीत होता. मात्र आम्हाला त्यात कोणताही पुरावा आढळून आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

तुरुंगातून अरविंद केजरीवाल देत असलेल्या संदेशाची ईडी घेणार गंभीर दखल

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मनी लॉंडरिंग प्रकरणी ईडीने अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *