Breaking News

राज्यातील भाजप नेते पंतप्रधान मोदींचे पण ऐकत नाहीत हेच सिद्ध होतय जनहितासाठी की मतासाठी आहे याचं उत्तर तेच देऊ शकतात - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाचे संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिका घेत आहेत. मात्र याला विरोध करुन भाजप नेते मोदींचे पण ऐकत नाहीत हे सिद्ध होत असून हे जनहितासाठी की मतासाठी आहे याचं उत्तर तेच देऊ शकतात अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी लगावला.

भाजपचे नेते लोकल ट्रेन सर्वसाधारण लोकांसाठी सुरू व्हावी म्हणून व मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत आहेत. त्यांनी त्याचपध्दतीने काळजी घेण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल तसतशी अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे अगोदरच सांगितले आहे. मात्र याउलट भाजप नेते वागत असून मंदिरे उघडण्यासाठी व लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी आंदोलने करत आहेत या दुटप्पी भूमिकेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सुशांतसिंगच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठीच – मलिक

सुशांतसिंग राजपूतच्या केसमध्ये ही हत्या की आत्महत्या होती हे सीबीआयने एक वर्ष झाले तरी स्पष्ट केले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते असा थेट आरोप त्यांनी केला.

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयने ताब्यात घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. मात्र अजूनही यामध्ये सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. एखादी घटना घडली की त्या – त्या राज्यात तपास राहतो मात्र सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने त्यांच्या हद्दीत हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले होते. सीबीआय एक वर्ष या प्रकरणाचा तपास करतेय आणि अजून ही हत्या की आत्महत्या हे सांगू शकलेली नसल्याचेही ते म्हणाले.

बिहार निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठीच सुशांतसिंग राजपूतचे प्रकरण रंगवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *