Breaking News

…तर मोदींच्या गुजरात सरकारमध्ये दाऊदचा हस्तक मंत्री होता मंत्री नवाब मलिक यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील सरकार हे गुंड व पोलिसांच्या जीवावर चालत असल्याचा आरोप नुकताच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यास प्रतित्तुर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर देत गुजरातमधील मोदी-शाह यांच्या सरकारमध्ये तर दाऊदचा हस्तक आणि टाडा लावलेला आरोप पुरुषोत्तम सोलंकी होता अशी आठवण करून देत आताही भाजपामध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल असलेलेच नेते असल्याची आठवण त्यांनी करून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना करून दिली.

ज्या राजकीय लोकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामध्ये सर्वाधिक केसेस असणारे नेते भाजपचे आहेत असा टोला लगावत मलिक यांनी लगावत मोदीजी व अमित शाह हे ज्या पध्दतीने गुजरातमध्ये सरकार चालवत होते. त्यांच्या सरकारमध्ये पुरुषोत्तम सोलंकी नावाचा दाऊदचा हस्तक होता. त्याला मंत्री केले होते. ज्यांच्यावर टाडा लावला होता त्यांना मोदीं मंत्री करत होते आणि आजही मोदींच्या कॅबिनेटमध्ये असे लोक असल्याचे सांगत भाजपशासित राज्यातही ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत असेही लोक असल्याची आठवण त्यांनी पाटील यांना करून दिली.

सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होतेय – नवाब मलिक 

सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय लोकांवर सूडभावनेने कारवाई होत होती हे सत्य असल्याचे प्रतिक्रिया मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली.

ईडी व सीबीआय यांचा देशातील तपास ज्यापध्दतीने सुरू आहे त्यावर सुप्रीम कोर्टाने एकप्रकारे शंका निर्माण केली आहे. सुप्रीम कोर्टाने या दोन्ही एजन्सींना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते. मात्र त्यांनी याद्या देऊन त्यांचं काम पूर्ण झालं अशी भूमिका घेतली आहे. ईडी व सीबीआयकडे राजकीय व इतर किती केसेस प्रलंबित आहेत याची माहिती सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. याचाच अर्थ ईडी व सीबीआय या एजन्सींच्या कारवाईवर शंका उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

खडसे यांची संपत्ती जप्त करण्यात आली तर काहींना वारंवार बोलावून त्रास दिला जातोय अशा प्रकारे राजकीय दबावाने काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

दिवसात एक कोटीचा लसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला हा मोठेपणाचा विषय नाही -मलिक

देशात दरदिवशी एक कोटी लस उपलब्ध झाली पाहिजे, तर महाराष्ट्रात दर दिवशी २०-२५ लाख लोक लसीच्या दुसर्‍या डोससाठी प्रतिक्षेत आहेत त्यामुळे देशात एका दिवसात एक कोटीचा लसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला हा मोठेपणाचा विषय नाही असा टोलाही त्यांनी केंद्राला लगावला.

देशात एका दिवसात एक कोटी लसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला तसाच महाराष्ट्रात एका दिवसात ११ लाख लोकांना लस देण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या डोसच्या लसीचा साठा राज्य सरकारला गरजेचा आहे. दरम्यान केरळ व महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या दोन राज्यात जास्तीत जास्त लस साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

गोपीचंद पडळकर यांचा खोचक टोला, आज कुणीही पावसात भिजलं तरी… राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर साधला निशाणा

विधान परिषदेतील १० रिक्त जागांसाठी जाहिर करण्यात आलेल्या निवडणूकीसाठी आज मतदान होत असून यात कोणताही …

Leave a Reply

Your email address will not be published.