Breaking News

उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले, पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो कायद्यातील तरतूदीवर ठेवले बोट

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर आता विधिमंडळात आपलीच खरी शिवसेना म्हणून ओळख निर्माण करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्या अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्षांसोबत पत्र व्यवहार सुरु केला आहे. एकाबाजूला एकनाथ शिंदे आणि दुसऱ्याबाजूला उध्दव ठाकरे यांच्याकडून विधिमंडळात आपलीच शिवसेना खरी असल्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. बंडखोर आमदारांकडून एकनाथ शिंदे यांना गटनेता निवडण्यात आले आहे. तसे पत्र एकनाथ शिंदे यांनी पाठविले. त्यावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे.

यासंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो आणि गटनेत्याने प्रतोद निवडायचा असतो. याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी निवडलं होतं, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्तीचं पत्र दिलं आहे.

बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी नवा गट स्थापन करण्याबाबत पाठिंबा असलेल्या आमदारांचं पत्र पाठवलं आहे. यावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिंदे गटाने पाठवलेल्या पत्रात काही अपक्ष आमदारांची नावंही आहेत. त्यामुळे अपक्ष आमदारांना तो अधिकार आहे की नाही हे तपासलं जाईल. तसेच अपक्ष आमदारांची मतं गृहीत धरली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नरहरी झिरवळ पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरी यांचं पत्र दिलं. ते मी स्विकारलं आहे. माझ्याकडे सुनिल प्रभु प्रतोद आहे हेच पत्र आलंय. त्या दिवशी देण्यात आलेल्या पत्रावर सुनिल प्रभु यांनी प्रतोद म्हणून सही केली आहे. माझ्याकडे एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्याकडे २/३ बहुमत असल्याचं कोणतंही पत्र आलेलं नाही. दावा करणं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही ते म्हणाले.

विशिष्ट गट स्थापन करण्याचं जे पत्र माझ्याकडे आलं आहे त्यावर ३०-३२ आमदारांच्या सह्या आहेत त्यातही संशय आहे. आमदार नितीन देशमुख यांनी ते इंग्रजी स्वाक्षरी करतात आणि पत्रावर त्यांच्या नावासमोर मराठीत स्वाक्षरी आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यावर तपासणी करावी लागेल. त्यावर अपक्ष आमदारांच्या सह्या असतील तर त्यांना त्याबाबत अधिकार आहे का याचाही विचार करावा लागेल. शिवसेना पक्ष म्हणून अपक्षांची मतं त्यात गृहीत धरली जाणार नाही असेही ते म्हणाले.

शिवसेना आमदार नितीन देशमुखांनी ते सुरतला होते असं सांगितलं, पण आता ते त्यांच्या गावी आहेत. त्यांनी मी इंग्रजी सही करतो, मात्र पत्रावरील सही मराठी आहे. त्यामुळे माझी स्वाक्षरी गृहीत धरू नये असं प्रश्नांकीत केलंय. मी ते तपासून घेईल आणि माझी खात्री झाली की विचार करेन असेही त्यांनी स्पष्ट होते.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा

आपल्या मुस्लिम बंधू-भगिनींविषयी त्यांनी केलेले द्वेषपूर्ण भाषण आणि जातीय आधारावर मतदान करण्याचे आवाहन त्यांच्या जिंकण्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *