Breaking News

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक पाडवा भेटः वाहतूक भत्त्यात वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या महागाई भत्यात ३ टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारनेही सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेत गुढी पाडव्याची भेट शासकीय कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रवासी वाहतूक भत्यातही वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे एक दिवसाच्या अंतराने राज्य सरकारने गुढी पाडव्याची भेट राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिली.
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरांत १ एप्रिल पासून सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
एस-20 व त्यावरील वेतन स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूहात ५४०० रुपये व इतर ठिकाणी २७०० रुपये, एस-7 ते एस-19 स्तरासाठी अनुक्रमे २७०० व १३५० रुपये, एस-1 ते एस-6 स्तरासाठी १००० व ६७५ रुपये. उपरोक्त एस-1 ते एस-6 या वेतन स्तरामधील २४ हजार २०० रुपये व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना २७०० रुपये व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना १३५० रुपये इतका वाहतूक भत्ता मिळेल.
तसेच अंध, अस्थिव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पिडीत असणाऱ्या तसेच मुकबधीर /श्रवणशक्तीतल दोष असणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे वाहतूक भत्ता राहील. एस-20 व त्यावरील वेतन स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूहात १० हजार ८०० रुपये व इतर ठिकाणी ५४०० रुपये, एस-7 ते एस-19 स्तरासाठी अनुक्रमे ५४०० व २७०० रुपये, एस-1 ते एस-6 स्तरासाठी २२५० व २२५० रुपये अशी सुधारणा असेल. एस-1 ते एस-6 या वेतन स्तरामधील २४ हजार २०० व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना ५४०० रुपये व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना २७०० रुपये इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील. यासाठी ७०० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *