Breaking News

मलिक यांच्या विरोधातील कंबोजच्या याचिकेवरील प्रक्रियेस न्यायालयाची परवानगी अब्रु नुकसानीवरील कारवाईला माझगांव न्यायालयाची मान्यता

मुंबईः प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबीला लक्ष्य करताना भारतीय जनता पार्टीचे नाव घेण्यात येत होते. त्याचबरोबर मोहित कंबोज-भारतीय आणि त्यांचा मेहुणा रिषभ सचदेवा यांची जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याप्रकरणी मोहित कंबोज यांनी माझगांव न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने नवाब मलिक यांना नोटीस जारी केली.
या याचिकेत कंबोज यांनी एनसीबीला लक्ष्य करण्यासाठी एनसीबी ही भाजपाच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. त्याचा दाखल देत मलिक यांच्या पत्रकार परिषदांमधून सुरुवातीपासूनच या पध्दतीचे कथानक रचून एनसीबी आणि भाजपाचे संबध असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच कॉर्डिलिया क्रुज शिप प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या आर्यन खान प्रकरणातील इतरांशी मलिक यांचे काळजी करण्याइतपत संबध असल्याचा गंभीर आरोपही कंबोज यांनी आपल्या याचिकेत करण्यात आला.
एनसीबीला लक्ष्य करण्यासाठी मलिक हे राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असून मंत्रिमंडळातील त्या पदाच्या अधिकाराचा त्यांनी दुरोपयोग केल्याचा आरोपही नवाब मलिक यांच्यावर याचिकेच्या माध्यमातून केला.
मलिक यांच्याकडून करण्यात येत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मोहित कंबोज यांनी ९ ऑक्टोंबर रोजी नोटीस जारी करत मलिक यांना यापुढे कोणतेही वक्तव्य करण्यास मनाई करणारी नोटीस बजावली. परंतु मलिक यांनी पुन्हा ११ ऑक्टोंबरला पुन्हा कंबोज यांचेवर आरोप केले. त्यानंतर पुन्हा एकदा अर्थात दुसऱ्यांदा मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवत केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करा किंवा आरोप करणे बंद करा असा इशारा दिला.
त्यानंतरही मलिक यांनी आपल्यावरील आरोप करणे तसेच सुरु ठेवल्याने भारतीय दंड विधानसंहिता कलम ४९९ आणि ५०० (डिफेमेशन अॅक्ट) तरतूदींचा भंग केल्याने अखेर कंबोज यांनी माझगांव न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील पुढील कारवाईस न्यायालयाने आज सोमवारी परवानगी दिली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *