Breaking News

“मुस्लिम द्वेषाच्या धंद्यावर राजकारण” म्हणत मनसे नेते इरफान शेखचा राजीनामा चला माझ्याबरोबर मदरशात काय चालते ते दाखवतो

गुढी पाडव्याच्या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्यावरून टोकाची भूमिका घेत मुंबईसह मुंब्ऱ्यातल्या मदरशांवर धाडी घालण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून पुण्याचे मनसे नेते मोरे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर एका मुस्लिम मनसैनिकाने राजीनामा दिला. त्यानंतर आज मनसेचे प्रदेश सचिव नेते इरफान शेख यांनी मु्स्लिम द्वेषाच्या धंद्यावर राजकारण चालतं त्यांना भोंग्याचा त्रास होतो, मदरश्यांना बदनाम करण्याचे त्यांचे काम असल्याचा आरोप करत सोशल मिडीयावर एक भावनिक पोस्ट लिहीत मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’..!”, या मथळ्याखाली इरफान यांनी फेसबुकवर राजीनाम्याची पोस्ट लिहिलीय. “खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल आणि स्वतः पक्षाध्यक्षच जर भूमिका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची वेळ आली आहे असे रोखठोक मतही त्यांनी आपल्या पोष्टमध्ये मांडले.

म्हणे मदरश्यांवर छापे मारा पाहा काय काय मिळतं! राजसाहेब, कित्येक गोरगरीबांच्या मुलांचे मदरश्यात शिक्षण होते. तिथे कधीच काही चुकीचं होत नाही. नसेल तर माझ्यासोबत चला मी दाखवतो मदरसे. मात्र बदनामी का? असा सवाल करत इरफान शेख यांनी मुस्लिम द्वेषाच्या धंद्यांवर ज्यांचे राजकारण चालतं त्यांना मशिदींच्या भोंग्यांपासून त्रास होतो. मदरश्यांना बदमान करायचं काम त्यांचं आहे. अशा शक्तींच्यामागे आपल्याला जायची गरजच का आली? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का असल्या राजकारणाची गरज का पडली? असा उपरोधिक सवालही त्यांनी यावेळी केला.

इरफान शेख आहेत तरी नेमके कोण?

मनसेच्या कल्याण जिल्हा, राज्य पातळीवरील अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पाडल्या. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत मनसेला सर्वाधिक जागा मिळवून देण्यात शेख यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मनसेच्या अनेक आंदोलनात अग्रभागी राहून अनेक गुन्हे अंगावर घेतले. न्यायालयात फेऱ्या मारल्या. मराठी पाट्या आंदोलनात पोलिसांचा सुज येईपर्यंत मार खाल्ला.

Check Also

मंत्री तानाजी सावंत म्हणाले, आम्हाला मागील तोटा भरून काढायचाय सोलापूरातील सभेत बोलताना केली घोषणा

शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारची स्थापन होऊन ६० दिवस झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published.