Breaking News

राज ठाकरेंचा पवारांना टोला, उध्दव ठाकरेंना सवाल तर राणा दाम्पत्यावर टीका भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंगच्या इशाऱ्यावर चकार शब्द नाही

अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांने दिलेल्या इशाऱ्यावर आणि टीकेवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे काही तरी बोलतील अशी आशा मनसैनिकांना होती. मात्र राज ठाकरे यांनी ब्रिजभूषण शरण सिंग याने दिलेल्या इशाऱ्यावर चकार शब्दानेही न बोलता उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरच टीका केल्याचे दृष्य आज पहायला मिळाले.

उत्तर प्रदेशातून राज ठाकरे यांच्या दौऱ्याला वाढता विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अयोध्याचा दौरा तुर्तास स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर आज पुण्यातील गणेश कला क्रिडा केंद्राच्या मंचच्या सभागृहात आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते.

भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले राज म्हणाले की, आपल्याला तशी बंदिस्त सभागृहातील सभा परवडत नाही. सभा घेण्याच्या अनुषंगाने सर्वात आधी एसपी कॉलेजला विचारणा केली. मात्र त्यांनी हल्ली कोणालाच देत नसल्याचे सांगितले. त्यामुळे आम्हाला नाही तर कोणालाच नाही असे सूचक वक्तव्य करत मग नदी पात्रातील जागेचा विषय आला. पण आताची परिस्थिती पाहता पावसाचे आगमन कधीही होवू शकते. काल मुंबईत पाऊस पडला. त्यामुळे पुण्यातही पाऊस कधीही पडू शकेल. आणि आता निवडणूका सध्या जवळ नसल्याने उगाच पावसात कशाला भीजा असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.

सध्या राज्यात सारा पोरखेळ सुरु असल्याचे सांगत एकजण दुसऱ्याला म्हणतोय की, आमचं हिंदूत्व खरे आहे दुसऱ्याचे नकली आहे. त्यांना नेमके हिंदूत्व नेमके काय हेच यांना माहित नाही. नुसतं हिंदूत्वाच्या नावावर पकाक पकाक सुरु असून तेवढ्यापुरतेच यांचे हिंदूत्व सीमीत आहे. लोकांना असल्या पकाकवर अजिबात विश्वास राहीला नाही. लोकांना फक्त हिंदूत्वाचा रिझल्ट हवा आहे. आपण लाऊडस्पीकरचा विषय काढताच ९२ ते ९४ टक्के भोंगे बंद झाले तर काही भोंग्यांनी आवाज कमी केला. मात्र हे एक दिवसाचे आंदोलन नाही. आपण शांत राहिलो तर त्यांच्या भोंग्याचे आवाज पुन्हा वाढतील असा इशारा त्यांनी दिला.

तसेच ज्या मस्जिदींवरील भोंगे वाजतील त्या मस्जिदींसमोर जावून हनुमान चालिसा लावा असे मी सांगितले. त्यावर ते राणा दाम्पत्य हनुमान चालिसा म्हणायला मातोश्री बंगल्यावर गेले. अरे तो मातोश्री बंगला आहे मस्जिद आहे का? असा टोला लगावत त्यानंतर त्या दोघांना अटक केली. तुरूंगात गेले. एकाबाजूला मधु दुसऱ्याबाजूला चंद्र अशा स्थितीत त्यांना ठेवण्यात आले. त्यानंतर ते काहीही बोलत गेले आणि शिवसेना काहीही बोलत गेली. बरं इतके होवून हे परत सिमल्यात शिवसेनेचे संजय राऊत आणि राणा दाम्पत्याचे एकत्र जेवण करतानाचे फोटो व्हायरल झाले. हे यांचे असले राजकारण शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना त्याच काही वाटत नाही असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांना लगावला.

शरद पवार सांगतायत बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना आम्ही दिवसभर भांडायचो आणि रात्री एकत्रित जेवायचो असे सांगण्याने बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी कमी होतेय हे शिवसेनेच्या लक्षात कसे येत नाही. त्यांना माहितच नाही ते कोणासोबत सत्तेत बसले आहेत. बर उध्दव ठाकरें फक्त १९९२-९३ च्या दंगलीचा उल्लेख करायचा आणि त्यावरच खोगत बसायचे असे यांचे राजकारण आहे. उध्दव ठाकरेंनी मला सांगावं की त्यांच्या अंगावर एक तर आंदोलनाची किंवा दंगलीची केस आहे का? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

बरं ते औरंगाबादचे नांमातर झाले, नाही झाले काय फरक पडणार असे सांगत मी म्हणतोय ना असे उध्दव ठाकरे म्हणाले. याचा अर्थ त्यांना त्या औरंगाबादचे नांमातर करायचे नाही. फक्त निवडणूकीपुरता यांना त्यावरून राजकारण करायचे आहे. यांच्या हिंदू-मुस्लिम मतांच्या धुव्रीकरणामुळे यांनी त्या निझामाची अवलाद असलेल्या एमआयएमला मोठे केले. तो राक्षस आता छत्रपती संभाजी महाराजांना मारायला महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर डोके ठेवून जातात. अनं महाराष्ट्र थंड इतके होवूनही. असेच शांत रहा अशी उपहासात्मक टीपण्णी त्यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *