Breaking News

राज ठाकरे म्हणाले, कोणीतरी उठतो माफी मागा म्हणतो… राजकारण नीट समजून घ्या भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग याचे नाव न घेता प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न

अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवणार नसल्याचा इशारा दिला. त्यातच राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर पुण्यात आयोजित जाहिर सभेत आज ठाकरे म्हणाले की, पुण्यातल्या पत्रकार परिषदेत मी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर लगेच दोन तीन दिवसात उत्तर प्रदेशातला कोणी तरी खासदार उठतो आणि माफी मागा म्हणतो असे आणि मुख्यमंत्र्याला आव्हान देतो. हे काय सहज शक्य आहे का? यामागचे राजकारण नीट समजून घ्या असे सांगत त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविली गेल्याचा सूचक आरोपही केला.

पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेश कला क्रिडा मंचाच्या सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पुण्यातील सर्व मनसैनिकांसह राज्याच्या विविध भागातून अनेक कार्यकर्त्ये खास आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यामागे ज्यांना आपला लाऊडस्पीकरचा मुद्दा रूचला नाही, ज्यांना आपला अयोध्येचा दौरा आवडला नाही त्यांनी ही रसद पुरविली असल्याचे सांगत हे सगळं सुरु झाल्यावर त्याची माहिती मला मुंबईतून मिळत होती, दिल्लीतून मिळत होती आणि उत्तर प्रदेशातील काही जणांकडूनही मिळत होती. या निमित्ताने आपल्या विरोधात ट्रॅप सापळा लावण्यात आला होता. या सापळ्यात अडकायचं नव्हते. उद्या जरी हट्ट म्हणून जरी गेलो असतो अन् काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेलीच असती ना. मग आपल्या पोरांवर केसेस टाकल्या असत्या आणि निवडणूका आल्यानंतर ते सगळं लावून दिलं असत सगळ्यांच्या मागे अन आपण तिकडे आणि इथं कोणीच नाही असे झालं असते असेही त्यांनी सांगितले.

मला आपल्या पोरांना अडकावायचं नाही. माझी ताकद तिथे अडकावण्याचा सापळा रचण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

इतरवेळी ही सगळी मंडळी आपापसात भांडत असतात मात्र आपल्या विरोधात ते सगळेजण एकत्र येतात. त्यातूनच महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात रसद पोहोचवली गेली. हे राजकारण नीट समजून घ्या असे आवाहन करत आपला मुद्दा त्यांना रूचला नाही म्हणून या गोष्टी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

माफी मागणारे इतके दिवस कोठे होते. त्या आंदोलनाला आता १२-१४ वर्षे झाली. त्यानंतर या सगळ्यांना आता आठवण झाली काय असा सवाल करत जेव्हा रेल्वेच्या परिक्षेसाठी म्हणून सगळे लोंढे मुंबईत आले. त्यावेळी मी आपल्या कार्यकर्त्यांना त्यांना जावून बोला, कशासाठी आले, त्यांची विचारपूस करा बोला त्यांच्याशी म्हणून सांगितले. त्यानुसार आपले कार्यकर्त्ये गेले ते बोलत असताना त्यापैकी एकाने मनसैनिकाला आईवरून शिवी दिली आणि तेथून हे सगळं सुरु झाले. त्यावेळी हे सगळे कोठे होते. हे एकदम आताच का सुरु झालंय हे समजून घ्या. गुजरातमध्ये आशुतोष ठाकूर नामक गृहस्थ आहे. तिथे नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांपैकी एकाने तेथील मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर रात्रीतून १० ते १५ हजार हे कामगार गुजरातमधून हाकलले अनं ते सगळे आपल्या इथे आले. आता गुजरातमधून कोणाची माफी मागायला लावणार ? आणि कोणाकडून असा सवालही त्यांनी उत्तर भारतीय नेत्यांना त्यांनी केला.

यावेळी राज ठाकरे यांनी आपले दुखणं वाढल्याचे सांगत पुण्यात आलो होतो. मात्र दुखणं वाढल्याने आणि पुण्यात विशेष असा काही कार्यक्रम नसल्याने मी पुन्हा परत गेलो. दुखण्याच्या अनुषंगाने डॉक्टरांशी भेटलो, चर्चा केली. पायाच्या दुखण्याने माझ्या पाठीच्या हाडाचे दुखणं वाढलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे आता १ जूनला माझ्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यानंतरचे तीन-चार आठवडे रिकव्हरीत जाणार आहेत. त्यामुळे पुढील महिना-दिड महिन्यानंतर पुन्हा आपण भेटू असे सांगत त्यावेळी माझ्या मनात जे काही आहे ते सांगेन, काय करायचे ते सांगेन असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *