Breaking News

राज ठाकरे यांच्या आरोपानंतर मनसे नेत्यांकडून “तो” फोटो व्हायरल, एक तेल लावलेला पैलवान तर दुसरा.. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून समाजमाध्यमांवर फोटो शेअर करत केला आरोप

अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागितली तर त्यांना उत्तर प्रदेशात प्रवेश देवू अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला. त्याचबरोबर राज ठाकरें माफी मागता पोलिस काय लष्कर घेवून आले तरी त्यांना उत्तर प्रदेशात घुसू देणार नसल्याची धमकीही दिली.

या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नियोजित ५ जूनचा दौरा तुर्तास स्थगित केला. त्यानंतर रविवारी २२ मे रोजी झालेल्या जाहिर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या सगळ्यामागे सापळा रचल्याचा आरोप केला. त्यानंतर आज मनसे नेते संदिप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे याच्यासमवेत भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यासोबतचा तो फोटो ट्विटर आणि फेसबुकवर शेअर करत त्या सापळ्यामागे शरद पवार असल्याचा गंभीर आरोप केला.
तो फोटो शेअर करताना संदिप देशपांडे यांनी एक तेल लावलेला पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेला पैलवान यांची राजसाहेबांन विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत असल्याचा आहे वाक्य लिहिले आहे.

या वाक्यातून संदिप देशपांडे यांनी राज ठाकरे यांनी आरोप केलेल्या या सापळ्यामागे शरद पवार असल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सापळ्याला आता वेगळे वळण लागले जाण्याची शक्यता निर्माण झाली.

वाचा

खासदार ब्रिजभूषण शरण सिंग काय म्हणाले

यासंदर्भात काही प्रसारमाध्यमांनी भाजपा खासदार ब्रिजभूषण यांनाच विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार हे मोठे राष्ट्रीय नेते आहेत. ते महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे संरक्षक आहेत. तर मी राष्ट्रीय कुस्तीचा अध्यक्ष आहे.

व्हायरल झालेला तो फोटो हा तीन वर्षापूर्वीचा आहे. एका कार्यक्रमासाठी त्यांनी मला आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या गळ्यात सत्काराचा एकही हार घालून घेतला नाही.

उलट त्यांच्या सन्मानासाठी आलेला प्रत्येक हार त्यांनी माझ्या गळ्यात घालत माझा सन्मान केला. आजही शरद पवार आणि सुप्रिया सुळे या कोठेही माझ्या समोर आल्या तरी मी त्यांना टाळून पुढे जावू शकत नसल्याचे सांगत

माझ्या मनात त्यांच्याप्रती आदरभाव आजही असल्याचे स्पष्ट केले.

वाचा

त्या फोटोचा राजकारणाशी संबध जोडू नये 
तर यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, शरद पवारसाहेब हे अनेक वर्षांपासून कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि खासदार ब्रिजभूषण हेही सदस्य आहेत.

त्यामुळे मनसेने जो फोटो ट्वीट केला आहे त्याचा राजकारणाशी काही संबंध लावू नये असे आवाहन केले.

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत म्हणाले होते की, राज ठाकरे यांनी ज्या सापळ्याचा उल्लेख केला. त्या सापळ्यामागे दुसरं तिसरं कोणी नसून भाजपाच असल्याचा आरोप केला होता.

तसेच राज ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांच्या विरोधात उत्तर प्रदेशात गुन्हे दाखल करण्याचे षढयंत्र असल्याचे भाकित केले होते.

त्यानुसार आता राज ठाकरे यांनीच अयोध्या दौऱ्यामागे कट असल्याचा आरोप करत सापळा रचण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला असल्याचा दावाही केला होता.

या साऱ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची भीती खरच राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शरद पवार यांना वाटायला लागली काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

तसेच वायाची ४०-५० वर्षे राजकारणात घालविल्यानंतर शरद पवारांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची भीती वाटणे सर्वार्थाने हास्यास्पद वाटते.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला अभंगाचा नवा अर्थ, जो भंग होत नाही… देहू येथील संत तुकारामांच्या शिळा मंदिराचे लोकर्पण

संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published.