Breaking News

शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीवरून राज ठाकरेंनी म्हणाले, पोर होणार का?… जातीपातीमधून बाहेर पडल्याशिवाय चांगला महाराष्ट्र मिळणार नाही

मराठी ई-बातम्या टीम
राज्यात आगामी महानगरपालिका निवडणूकांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होणार का असा प्रश्न सध्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांना प्रसार माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले, ते मला काय माहित, तो प्रश्न त्यांना विचारा, त्याचं उत्तर मी कसे देऊ शकतो. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहित्य संमेलनासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना का हा प्रश्न विचारला नाही. त्यांच्या पक्षाच्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ? ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार? असे उत्तर देताच एकच हास्यकल्लोळात बुडाले.
अनेकांना जातीपातीच्या राजकारणातचं महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय आणि त्यासाठी हे सगळं चाललेलं राजकारण असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,
एकदम अचानक हा ओबीसीचा विषय आला कसा? मग ते केंद्र सरकारने यांना मोजणी करायला कशी काय सांगितली. मग कोर्टात याविरोधात कसा काय निर्णय आला? हे काही इतकं दिसतं तेवढं सरळ नाही प्रकरण. तुम्हाला आठवत असेल तर मी अनेकदा हा विषय बोललेलो आहे की, आपण जोपर्यंत जातीपातीमधून बाहेर येणार नाही. तोपर्यंत आपल्याला चांगली गोष्टी, चांगला महाराष्ट्र मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य विषय सगळे बाजूला पडतात आणि कसंय कुठल्याही गोष्टीची उत्तर तुम्हाला सापडतच नाहीत. आजही मला सापडलेलं नाही की मुकेश अंबानीच्या घराखाली गाडी ठेवली ती कशासाठी? काही कळलं का तुम्हाला त्यामधून? कोणालाच काही कळाले नाही. मी माझ्या पत्रकार परिषदेत बोललो होतो, की हा विषय राहील बाजूला आणि प्रकरण भलतीकडे जाईल. मग ती गाडी ठेवली कशासाठी? काय हेतू होता? कोणी करवलं ते? ते राहीलं बाजूला देशमुख आत टाकल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरही आपली भूमिका मांडली. राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर बोलताना अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.
एसटीचा विषय नीट आपण पाहणं आवश्यक आहे. मला माहिती जी मिळाली आहे, त्याप्रमाणे चुकीची ती आहे असं मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये एसटी कर्मचारी सर्व संघटनांना बाजूला करून एकवटले आहेत. तुमच्या हातात जे राज्य दिलेलं आहे ते लोकांसाठी दिलेलं आहे. लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नसल्याचा टोला राज ठाकरे यांनी अनिल परब यांना लगावला.
या सर्व गोष्टी जनता गांभीर्याने घेत नाही. त्या वेळेपुरते चिडायचे, रागावायचे आणि निवडणुकांना मतदान भलत्याच विषयांवर केले जाते. निवडणुकांच्यावेळी सगळ्याच गोष्टी विसरल्या जातात. नको त्या विषयांवर मतदान करणार असाल तर तुमचा राग कधी व्यक्त करणार? असा सवालही त्यांनी केला.
बिपिन रावत यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तसेच हा अपघात होता की घातपात? यावर संशय घेतला जात आहे. मात्र हा घातपात आहे, असं समजले तरी ते बाहेर येणार आहे का? या देशात अनेक प्रश्न आहेत, पण त्यांची उत्तरंच मिळत नाहीत हेच मी वारंवार सांगत असल्याचे ते म्हणाले.

Check Also

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, “आभासी उपस्थिती असली तरी पाठिंबा प्रत्यक्षच” निर्भया पथकाच्या धून उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे विरोधकांवर पलटवार

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची दुसऱ्याकडे द्या असा खोचल सल्ला विरोधकांकडून मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *