Breaking News

राज ठाकरेंनी केल्या दोन मोठ्या घोषणा, तर हनुमान चालिसा त्यांना ऐकावीच लागेल पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली माहिती

हनुमान जंयतीच्या निमित्ताने महाआरती करण्यासाठी पुणे येथे गेलेल्या राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मनसेचा आगामी कार्यक्रम जाहीर केला. मात्र दुसऱ्याबाजूला ३ एप्रिलपर्यत जर मस्जिदीवरील भोंगे काढले नाहीत तर त्यांना आमची हनुमान चालिसा ऐकावीच लागले असा गर्भित इशाराही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज दिला.

१ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादेतील मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा घेणार असून त्यानंतर ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा देत राज्यातील मनसेचा पुढील नियोजित कार्यक्रम जाहीर केला.

काल हनुमान जयंती असल्याने राज ठाकरे यांनी येथील खालकर चौकातील हनुमान मंदीर जात महाआरती केली. तसेच यावेळी हनुमान चालिसाचे पठण केले. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आज ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. त्यावर त्यांनी वरील या घोषणा करत प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

यावेळी ते बोलताना ते म्हणाले की, राज्यातील सर्व मस्जिदीवरील भोंगे अनधिकृतच आहेत ना? मग आमच्या पोरांनी मोठ्या आवाजात लाऊडस्पिकर लावून हनुमान चालिसा लावली तर अनधिकृत कसे ठरविता असा सवाल करत सध्या रमझान सुरु असल्याने मी त्यांना ३ एप्रिल पर्यत त्यांना मुदत दिली आहे. मी त्या दिवशीही सांगितलेय आणि आताही सांगतोय की हा विषय सामाजिक विषय म्हणून हाती घेतला आहे. या भोंग्याचा त्रास फक्त हिंदूनाच होतो असे नाही तर त्याचा त्रास मुस्लिमांनाही होतो असे त्यांनी सांगितले.

दिल्लीतील शोभा यात्रेवर दगडफेक झाल्याच्या प्रकारानंतर तसाच प्रकार महाराष्ट्रात झाला तर असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आमच्याकडून मिरवणूक निघत असताना त्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही हातात घेता येतो. समोर जे कोणतं हत्यार असेल ते आमच्याही हातात घ्यायला लावू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

देशभरातल्या हिंदू बांधवांनो तयार राहा. ३ मे पर्यंत जर त्यांना समजले नाही तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे. मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

माझ्या सभेमध्ये मी स्पष्ट केले होते की, हा सामाजिक विषय आहे. त्याच्याकडे त्याच अंगाने पाहणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा मुस्लिमांनाही त्रास होत आहे. अनेक वर्षे हा विषय असाच राहिला आहे. तुम्ही पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मला दोन घोषणा करायच्या असल्याने पत्रकार परिषद बोलवण्यात आली आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा अनेक गोष्टी मी बोलेन. त्यामुळे आजची पत्रकार परिषद देशभरातल्या सर्वांना माझे एवढेच सांगने आहे भोंग्याचा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे.

यावेळी संजय राऊत यांनी नवओवेसी असा शब्द वापरला असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, असा लवंड्यावर मी फारसे बोलत नाही असा सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *