गुढी पाडव्याच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जर अजाणासाठी लावण्यात येणारे भोंगे जर उतरविले नाहीत मस्जिदीसमोर मोठे भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करा असा इशारा दिला. या वक्तव्यावरून भाजपा वगळता सर्वच राजकिय पक्षांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. मात्र याप्रश्नावर पहिल्यांच आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, अशा प्रकारची आंदोलने करून जनतेमध्ये अस्वस्थतेची भावना तयार केली जात आहे. मात्र महाराष्ट्रात तसं काही होईल असे वाटत नाही. पोलिस लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
भोंगे उतरवण्याचा भाजपाचा अजेंडा आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारची आंदोलने करुन जनतेमध्ये अस्वस्थतेची भावना तयार केली जात आहे. मात्र महाराष्ट्रात तसं काही होईल असे वाटत नाही पोलीस लक्ष ठेवून आहेत असे त्यांनी सांगितले.
भाजपाच्या या अजेंडयाची सुरूवात कर्नाटक राज्यातून झाली आहे व अन्य राज्यांमध्येही हा अजेंडा भाजपाने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे. राज्यातील पोलीस यंत्रणा आपापल्यापरीने लक्ष ठेवून आहेत. भविष्यात कायदा व सुव्यवस्था असाच ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
संजय राऊत यांना कोणतीही नोटीस न देता किंवा चौकशी न करता कारवाई ईडी करत असेल तर केंद्र सरकारचा कारभार कशाप्रकारे सुरू आहे हे लक्षात येत आहे. मात्र यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
