Breaking News

गोपीचंद पडळकर यांचा खोचक टोला, आज कुणीही पावसात भिजलं तरी… राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर साधला निशाणा

विधान परिषदेतील १० रिक्त जागांसाठी जाहिर करण्यात आलेल्या निवडणूकीसाठी आज मतदान होत असून यात कोणताही दगाफटका होवू नये यासाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून पुरेशी काळजी घेण्यात येत आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाली. जवळपास भाजपा आणि महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. तसेच भाजपा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये काटे की टक्कर सुरु आहे.

यापार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत आज कोणीही पावसात भिजलं तरी निवडणूकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा खोचक टोला लगावत भाजपाचे पाचही उमेदवार निवडूण येणार असल्याचा दावा केला.

भाजपा लोकशाहीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. त्यामुळे या राज्यात २०१९ चा जो विश्वासघात झाला, जनतेने दिलेल्या कौलाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन करण्यात आलं. परंतु आमदारांना पहिल्यांदा त्यांचं मत व्यक्त करण्याची योग्य संधी आली असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ज्या लोकांमधून हे आमदार निवडून आले आहेत त्या लोकांनी युतीचं सरकार येण्यासाठी १६१ आमदार युतीचे निवडून दिले होते. त्यामुळे आज हे सर्व आमदार मतदानातून व्यक्त होतील. अपक्ष आमदारांची मविआने अनेकदा अब्रू घालवली. ते लोकांमधून निवडून आले आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेवर यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. लोकांमध्ये या आमदारांविषयी मत कलुषित करण्याचा प्रयत्न झाला आहे. ते सर्व आमदार आजच्या दिवशी मतदानातून नक्कीच व्यक्त होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपाचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पडळकर म्हणाले, १७० आमदार असणाऱ्यांची बैठक पहाटे संपल्याचे माध्यमातून ऐकलं. भाजपाची बैठक रात्री साडेआठ वाजताच संपली. १७० आमदारांवाले पहाटेपर्यंत कशासाठी जागे आहेत? म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येतंय की त्यांच्यात काहीतरी गोंधळ उडाला आहे असा टोलाही महाविकास आघाडीला लगावला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *