मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी याा दोघाच्या प्रकरणातील दोषींवर राज्य सरकारने १५ तारखेपर्यंत कारवाई करावी अन्यथा राज्य बंद झालंच म्हणून समजा असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. तसेच पुढे बोलताना संतोष देशमुख यांच्या ७ मारेकऱ्यांना जो मकोका कायदा लावला आहे त्यात आठव्या आरोपीचा समावेश अद्याप करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपीवरही मकोका कायदा लागू करावा अशी मागणी करत नाहीतर ही कारवाई आम्हाला मान्य नाही असेही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी जाहिर केले.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी या करिता आम्ही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनआक्रोश मोर्चे काढत आहोत. त्यामुळे आज धाराशिव येथील मोर्चा पार पडण्याआधीच राज्य सरकारने त्या सात मारेकऱ्यांवर मकोका कायदा लावल्याची बातमी आलीय. मात्र या सात आरोपींबरोबरच आठवा आरोपी असलेला आणि त्याच्यावर खंडणीप्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावरही मकोका कायदा लावून त्याच्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लावलेले गुन्हे त्याच्यावरही दाखल करावे अशी मागणी यावेळी केली.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, सोमनाथ सुर्यवंशी यांचाही मृत्यू पोलिस कोठडीत झाला. त्याच्याही कुटुंबियांना न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे. त्याचा फोटो पाहून कोणाला वाटतय की तो गुन्हेगार होणार होता पण निष्पाप तरूणाचा बळी गेला. एका विद्यार्थ्यांचा बळी गेला. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात हा मोर्चा आहे. सोमनाथ सुर्यवंशीला मारणाऱ्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे. मग यात जातीचा कुठे उल्लेख आहे. हा मोर्चा माणुसकीच्या नात्याने आहे. पण जो बीडचा तो मंत्री धनंजय मुंडे हा त्याला जातीय रंग देत आहे. मी त्याला मागेच सांगितले होते की, तु कोणाचाही नाद कर पण माझा नाद करू नको. पण त्याचा हस्तक मी वंजारी समाजाच्या विरोधात असल्याचे सांगत जनआक्रोश मोर्चाच्या विरोधात प्रतिमोर्चा काढत आहे, त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही यावेळी गणेश हाके यांचे नाव न घेता केली.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की जर राज्य सरकारने १५ तारखेपर्यंत जर सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय दिला नाही तर महाराष्ट्र बंद झाला म्हणून समजा असा इशाराही यावेळी देत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांवर समाजाने विश्वास ठेवलाय, जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी या लोकांच्या आणि या दोघांच्या कुटुंबियांना जर दगाफटका केला तर मग सगळं संपलच म्हणून समजा असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
तसेच पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एका पोलिस अधिकाऱ्यांच्या ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. त्यामुलीने हे सगळं कसं सहन केलं असेल. मुख्यमंत्री तुम्ही जागे आहात का, या असल्या प्रकरणातील आरोपीला का अटक केली नाही, त्याच्या आईवडीलांना का अटक केली नाही असा सवाल करत थु तुमच्या जींदगाणीवर असे खोचक टीकाही यावेळी केली.