Breaking News

मुख्यमंत्र्याचा विरोधकांवर निशाणा: समाजातील काही घटकांना चिथावतायत मंदिर आणि धार्मिकस्तळावरून विरोधकांच्या इशाऱ्याला प्रतित्तुर

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाचा कमी झालेला संसर्ग पाहून विरोधकांकडून पुन्हा एकदा धार्मिकस्थळे, मंदिरे सुरु करण्याची मागणी करत राज्य सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सातत्याने देत असल्याच्या वक्तव्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत कोरोनाचा फैलावू नये यासाठी मी सांगितलेले आपण ऐकत आहात. परंतु काहीजण दुर्दैवाने समाजातील काही घटकांना चिथावत असल्याचा आरोप नामोल्लेख टाळत विरोधकांवर केला. मात्र जनता त्यांच्या चिथावणीला भीक घालत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले.

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आल्याने राज्य सरकारकडून हॉटेल, रेस्टॉरंटसह अन्य काही गोष्टींसाठी असलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यास सुरु केली. त्याच धर्तीवर मंदिर आणि धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करण्याची मागणी भाजपाप्रणित संघटनेकडून सातत्याने करण्यात येत असून त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केलेला आरोपाला महत्व आले आहे.

  ५० टक्के आरक्षणाची मर्यादा उठवावी

ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण देण्यासाठी केंद्राकडे असलेला इम्पिरिअल डेटा राज्याला देण्याबाबत पंतप्रधान यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच मराठा समाजालाही आरक्षण द्यावी अशी मागणीही करण्यात आली असून ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथील करण्याची पंतप्रधानांना विनंती केली. याबाबत अद्याप केंद्राची भूमिका स्पष्ट नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राने १०२ व्या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. परंतू आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत या प्रस्तावाचा उपयोग नसल्याने ही मर्यादा उठवावी व राज्याला आरक्षणाचे अधिकार द्यावेत अशी राज्याची मागणी पंतप्रधानांकडे केली असल्याची आठवण करून देत याबाबत एक-दोन दिवसात काय निर्णय होतोय पाहुया असेही ते म्हणाले.

नागरिकांना लस

राज्यात ४ कोटी ६३ लाख ७६ हजार नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ३ कोटी ४५ लाख ३० हजार ७१९ आहे तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार १०७ आहे. पहिला डोस देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्याची लसीकरण क्षमता फार मोठी आहे आपण एका दिवसात आठ ते दहा लाख नागरिकांचे लसीकरण करू शकतो परंतु लसीची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता आज घडीला मास्क हाच आपला खरा संरक्षक असल्याचेही ते म्हणाले

Check Also

उध्दव ठाकरेंचे नाव न घेता फडणवीस म्हणाले, त्या स्थगितीमुळे १० हजार कोटी वाढले मुंबई मेट्रो मार्गिका-३ च्या सुधारित प्रस्तावास मान्यता

बहुचर्चित कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्गासाठी आरे येथे कारशेड उभे करण्याच्या कामास तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published.