Breaking News

जितेंद्र आव्हाड यांची ती पोस्ट, कुस्तीत मोहोळ….मॅच आधीच फिक्स महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरून आव्हाडांनी पोस्ट करत आणखीनच व्यक्त केला संशय

मागील काही वर्षापासून राज्यात महाराष्ट्र कुस्ती परिषदेकडून राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र केसरीसाठी कुस्ती स्पर्धा घेण्यात येते. मात्र काल रात्री अहिल्यानगर येथे झालेल्या कुस्ती सामन्यात शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत महाराष्ट्र केसरी पदकासाठी कुस्ती झाली. या दोघांच्या लढतीत शिवराज राक्षे यांचा पृथ्वीराज मोहोळ यांचा विजय झाला तर शिवराज राक्षे यांचा पराभव झाला. त्यानंतर या विजयासंदर्भात राक्षे यांनी आक्षेप घेऊनही पंचानी शिवराज राक्षे याचा पराभव झाल्याचे जाहिर केले.

दरम्यान शिवराज राक्षे यांनी पंचाने दिलेल्या निर्णयाविरोधात तक्रार करताना पंचाने तेथे येत स्वतःच्या निर्णयाबाबत भाष्य केले. त्यावर शिवराज राक्षे यांनी पंचाच्या कॉलरला पकडले आणि लाथ घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट करत कुस्तीत मोहोळ…मॅच आधीच फिक्स असे लिहून आणखीनच या कुस्ती स्पर्धेवरून संशयकल्लोळ स्पष्ट केला.

जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले की, काल महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी उपांत्य फेरीचा सामना झाला अन् आर्श्चयकारक निकाल लागला. तसेच या उपांत्य फेरीचा व्हिडिओ मी खाली लिंकमध्ये टाकला आहे. हा व्हिडिओ कोणीही बघू शकतो, शिवराजची कूस खाली जमिनीला लागलीच नाही. मात्र पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आले. वास्तविक कूस जमिनीला लागल्यावर प्रतिस्पर्धी जिंकतो, आणि जर लागली नाही तर प्रतिस्पर्धी जिंकत नाही हे सांगण्यासाठी कोण्या तज्ञाची गरज नाही. जमिनीला पाठ लागली तरच चितपट जाहिर केले जाते. ही मॅट वरची कुस्ती आहे त्यामुळे सगळंच स्पष्ट दिसतय. कॅमेऱ्यामुळे अधिकच स्पष्ट झालंय. म्हणूनच कुस्ती फिक्स होती…मॅच फिक्सिंग होती हे उभ्या महाराष्ट्राला कळलं असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे जितेंद्र आव्हाड आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले की, कुस्तीत राजकारण शिरलंय हे खरोखरच ताकदीने आणि मेहनतीने पुढे आलेले पैलवान आहेत. त्यांना राजकारण करून मागे ढकलण्याचे काम सिकंदर शेखपासून सुरु झाले आहे. जो प्रकार अन्याय झाल्याने शिवराज राक्षेने पंचासोबत केला, तो प्रकार सिंकदर शेखने त्यावेळी पंचासोबत केला असता तर आतापर्यंत त्यांच्या आई-बहिणीची, खानदानीची लाज रस्त्यावर काढली असती. टोलधाडीने त्याला छळ छळला असता. पण त्याने अन्याय शांतपणे सहन केला आणि परत अन्यायावर मात करत महाराष्ट्र केसरी किताब पुन्हा जिंकला असेही यावेळी सांगितले.

शेवटी आपल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शेवटी कुस्तीत खरा जिंकला तो शिवराज राक्षेच. पृथ्वीराज मोहोळला ठरवून जिंकविण्यात आलं. अंतिम फेरीतही महेंद्र गायकवाड याने पंचाच्या पक्षपाती पणाचा आरोप करत मैदान सोडले. या स्पर्धेत कोण विरजण घालतय असा सवाल करत एवढं मोहोळ का उठलयं कारण राजकारण राजकारण असेही यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *