Breaking News

‘नियम सारखेच…’ बॅनरबाजीवर बच्चू कडूंचे प्रत्युत्तर, या अज्ञानामुळेच सत्ता जाते… पाषणा येथील बॅनरबॅजीवरून राष्ट्रवादीवर केली टीका

२०१९ साली कर्नाटकातील कोलर येथील जाहिर सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका करताना नरेंद्र मोदींबाबत अपमानकारक वक्तव्या केले. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर बच्चू कडू यांची आमदारकी (विधानसभा सदस्यत्व) रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर काल २५ मार्च रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील पाषाण रोड परिसरात लावले होते. या बॅनरवर लिहिण्यात आलं होतं की, आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम हे सर्वांना साखेच असतात. या बॅनरबाजीला शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी उत्तर दिले.

बच्चू कडू म्हणाले की, राष्ट्रवादीची बॅनरबाजी ही एकप्रकारची मूर्खता आहे. हे त्यांनी अज्ञानातून केले आहे. या अज्ञानपणामुळेच त्यांची सत्ता नेहमी जाते आणि भाजपा त्याचा फायदा घेते. मुळात मला जी शिक्षा सुनावली आहे ती दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आहे. त्यापैकी एक गुन्हा हा भारतीय दंड विधानाच्या कलम ५०४ अंतर्गत आहे, तर दुसरा भादंवि ३५३ या कलमाअंतर्गत आहे. एकाच गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली असती तर मी अपात्र ठरलो असतो. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा असेल तर उमेदवार अपात्र ठरत नाही असा दावा केला.

बच्चू कडू यांनी न्यायालयीन निकालावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, मुळात नियम काय सांगतो तर एकाच गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा ठोठावली असेल आणि उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली नाही तर उमेदवाराचं सदस्यत्व आमदारकी, खासदारकी, इत्यादी रद्द होतं, हे स्पष्ट आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांची भीती, भाजपाचेच सरकार पुन्हा आल्यास सर्वसामान्यांचा मतदानाचा…

देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असला पाहिजे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. पण त्यालाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *