Breaking News

सोमय्यांसह शिंदे गटावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, चोरांना क्लिनचीट…सध्या ४० जणांच चोरमंडळ त्यासाठीच शिवगर्जना यात्रा सुरु केलीय

शिवसेनेतील फुटीच्या आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुनावणी सुरु आहे. त्यातच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. त्यातच ठाकरे गटाकडून सुरु करण्यात आलेल्या शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने खासदार संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिंदे-भाजपा सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांसारख्या २८ चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला आहे. या प्रकरणाचा तपास यंत्रणांकडून सुरु होता. मात्र सरकार बदलताच या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. त्या विरोधात मी न्यायालयात याचिका दाखल करणार असून सध्या विधिमंडळ हे विधिमंडळ नसून ४० जणांचे चोर मंडळ असल्याची खोचक टीका केली.

यावेळी पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आयएनएस विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये गोळा केले. हे पैसे कुठं गेले याचा शेवटपर्यंत शोध लागला नाही. या प्रकरणाचा तपास याच तपास यंत्रणांकडून सुरू होता. मात्र, सरकार बदलताच या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. अशाप्रक्रारे या सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून २८ चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला आहे, असा आरोप करत तसेच यासंदर्भात मी स्वत: न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. याबरोबरच राज्यात सध्या विधिमंडळ नसून ४० जणांचं चोरमंडळ आहे, अशी खोचक टीकाही शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना संजय राऊत पुढे म्हणाले, जे लोकं सरकार विरोधात बोलतात, त्यांना तुरुंगात टाकायचं. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे. त्यांची बदनामी करायची, एवढेच उद्योग सध्या सुरू आहे. पण आताच्या सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं, की २०२४ मध्ये सगळ्यांचा हिशोब केला जाईल, अशा इशारा देखील राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्रातील भाजपा सरकारला दिला.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालावरही भाष्य करताना म्हणाले, कसब्याची जागा मुळात आमच्याकडे नव्हतीच. ती जागा ३०-३५ वर्ष भाजपाकडे होती. मात्र, यंदा ती भाजपाकडून जाते आहे. पिंपरीची जागा कोण जिंकेल, सांगता येत नाही. पण हा सुद्धा एकप्रकारे भाजपाचा पराभव आहे. तसेच कसबा आणि पिंपरीतल्या निवडणुका आपण हरतो आहे, हे लक्षात आल्यानंतर तिथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी पोलिसी यंत्रणेचा गैरवापर सुरू केल्याचा आरोपही केला.

शिवगर्जना यात्रा का सुरु करण्यात आली याचे उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, काल बच्चू कडू यांना एका शेतकऱ्याने रस्त्यावर अडवले होते. शेतकऱ्यांनी बच्चू कडूंना जाब विचारला, की तुम्ही ठाकरेंशी गद्दारी करत चोर-डाकूंबरोबर का गेलात. तोच विचार महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी आम्ही शिवगर्जना यात्रा सुरू केली असल्याचे स्पष्टीकरणही दिले.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *