Breaking News

शरद पवार म्हणाले, भाजपा त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना संपविते बिहारमधील राजकिय उलथापालथीनंतर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

महाराष्ट्रानंतर संख्याबळाच्याबाबत दुसऱ्या स्थानी असलेल्या बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी भाजपाबरोबरील सरकारचा राजीनामा देत काँग्रेस, डावे आणि आरजेडीच्या सहकार्याने पुन्हा महागठबंधन सरकार स्थापन केले. भाजपा नेते सुनिल कुमार मोदी यांनीही महाराष्ट्राचे उदाहरण देत नितीशकुमार यांना इशारा दिला. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार म्हणाले की, भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांना संपवतो असा आरोप करत पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाच उदाहरण समोर असून अकाली दलाला भाजपाने संपविल्याचा आरोप केला.

शरद पवार म्हणाले, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाही आणि आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील, असं विधान भाजपाकडून करण्यात आलं. यातून नितीश कुमार यांनी केलेली तक्रार स्पष्ट होते असेही म्हणाले.

भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो. कारण पंजाबमध्ये अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा मोठा नेता त्यांच्यासोबत होता. आज तो पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे असेही ते म्हणाले.

दरम्यान, नितीशकुमार यांनी भाजपाच्या पाठिंब्यावरील सरकारचा राजीनामा दिला. तसेच आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या मदतीने महागठबंधन सरकारचे आणि बिहारच्या आठव्यादा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर भाजपाचे बिहारमधील नेते सुशीलकुमार मोदी यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करताना म्हणाले, महाराष्ट्रात भाजपाला शिवसेनेने धोका दिला. त्यामुळे शिवसेनेत भाजपाने भूकंप घडवून आणला. आता नितीनकुमार यांनीही भाजपाला धोका दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचीही अवस्था शिवसेनेसारखी होईल असा इशारा दिला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *