Breaking News

राज्यसभेसाठी शिवसैनिकाचे नाव जाहिर होताच संभाजी राजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक सुरु

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना उमेदवारी हवी असेल तर त्यांनी शिवबंधन बांधून घ्यावे आणि आपली उमेदवारी घेवून जावी असे आवाहन शिवसेनेकडून केले. तसेच शिवबंधन बांधून घेण्यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संभाजी राजे यांना फोन करून निमंत्रण दिले. मात्र या निमंत्रणाकडे पाठ फिरवित राजेंनी थेट कोल्हापूर गाठले. परंतु राजेंचा पत्ता कट करून शिवसेनेने कोल्हापूरचे शहर प्रमुख संजय पवार यांचे नाव जाहिर करताच संभाजी राजे हे पुन्हा मुंबईच्या दिशेने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी कोल्हापूरहून निघाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी देणार की नाही यावर तर्क-वितर्क लढवले जात असताना अखेर संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, यावेळी त्यांनी अद्याप अधिकृत घोषणा करणं बाकी असल्याचं स्पष्ट करत मावळे असल्यानेच राजे असतात असं सांगत अप्रत्यक्षपणे संभाजीराजेंना टोलाही लगावला. दुसऱ्या जागेसाठी आपलं नावही ठरलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
संजय पवार यांचे नाव अंतिम झालं आहे. संजय पवार शिवसेनेचे मावळे असून उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि उमेदवार विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत. कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्के मावळे असून मावळे असतात म्हणून राजे असतात. पक्षनेते, पदाधिकारी हे मावळ्यांच्या जोरावर उभे असतात असा टोला लगावत संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालं असून नक्कीच सन्मान ठेवत आहोत. त्यांच्या कुटुंबाविषयी, गादीविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कायम आदर आहे. त्यासाठीच तर आम्ही सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार व्हा असा प्रस्ताव ठेवला. त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, अपक्ष लढायचं आहे आणि त्यासाठी ४२ मतांची गरज आहे. जर कोणाकडे ४२ मतं असतील तर तो राज्यसभेवर निवडून येऊ शकतो. संभाजीराजे अपक्ष लढणार असतील तर त्यांच्याकडे मतांची काय योजना आहे माहिती नाही. पण प्रस्ताव आला तेव्हा गादी, छत्रपतींच्या वंशजाचा सन्मान लक्षात घेता शिवसेना उमेदवारी देईल, पक्षात प्रवेश करा असं सांगितलं होतं असेही ते म्हणाले.
संभाजीराजेंच्या समर्थकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही कोणाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील नाही. त्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती नसावा. एकनाथ ठाकूर हे कडवट शिवसैनिक होते. ज्या सामनाच्या इमारतीखाली आपण बोलत आहोत त्यातही त्यांचा वाटा होता. प्रियंका चतुर्वेदीदेखील शिवसेनेच्याच उमेदवार आहेत. प्रितीश नंदी हेदेखील शिवसेनेचे उमेदवार होते असे सांगत ते पुढे म्हणाले की, यापूर्वीसुद्धा वरिष्ठ शाहू महाराजांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शाहू महाराजसुद्धा पक्षाच्या तिकीटावर लोकसभा लढले आहेत. मालोजीराव भोसले हेदेखील पक्षाच्या तिकीटावर उमेदवारी घेऊन लढले आहेत. स्वत: संभाजीराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर कोल्हापुरातून निवडणूक लढले आहेत. त्यामुळे राजांना, महाराजांना पक्षाचं वावडं असू नये. देशभरातील अनेक राजघराण्याचे लोक आजही अनेक पक्षांच्या तिकीटावर राज्यसभेत, लोकसभेत आले आहेत याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

Check Also

राज्यसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्या सारखं… शिवसेनेला लगावला टोला

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या उमेदवारानं बाजी मारल्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published.