Breaking News

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी देणाऱ्यास मुंबई पोलिसांनी केली अटक गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम

राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूत यास बंगळूरू येथून अटक करण्यात आली असून मुंबई न्यायालयात त्याला हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

आदित्य ठाकरे यांना धमकी दिल्याबाबतची माहिती शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित करत सभागृहास सांगितले की, धमकी देणाऱ्याने आधी फोन केला. तो फोन आदित्य ठाकरे यांनी घेतला नाही. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने तीन-चारवेळा मेसेज केला. त्यातील काही मेसेज हे सुशांत सिंग राजपूत याचा उल्लेख असलेले होते. त्यानंतर त्याने फोन केला असता त्यांनी तो स्विकारल्यानंतर आदीत्य ठाकरे यांना जीव मारण्याची धमकी दिल्याची माहिती दिली.

त्यानंतर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय गंभीर असल्याचे सांगत आमचे कस्टोडियन हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वीही एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांना धमक्या आलेल्या आहेत. त्याची पोलिसांकडे तक्रार दाखल केली तर थातूरमातूर उत्तरे दिली जातात. त्यामुळे यासंदर्भात राज्य सरकारनेच काही ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली.

सुधीर मुनगंटीवार यांच्या या आक्षेपावर म्हणाले की, मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्याला जयसिंग राजपूत यास बंगळूरू येथून अटक करून त्याला मुंबईत आणण्यात आले आहे. त्याला लगेच न्यायालयात हजरही करण्यात आले असून न्यायालयाने त्यास तीन दिवसांची कोठडी दिली.

तसेच ज्यांना धमक्या मिळालेल्या आहेत किंवा मिळत आहेत यासंदर्भात सर्वकष धोरण तयार करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात येणार असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले.

त्यावर मुनगंटीवार यांनी एसआयटी करण्यापेक्षा आमदारांची एक समिती बनविण्याची मागणी केली.

मुनगंटीवारांच्या या मागणीवर वळसे-पाटील यांनी आमदारांची समिती स्थापन करून काय करायचेय असा सवाल केला.

त्यानंतर अखेर वळसे-पाटील यांनी यासंदर्भात एसआयटी स्थापन करून तपास करण्यात येणार असल्याचे सांगत धोरणही तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *