Breaking News

विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबविणारः शिक्षकांना मिळणार खास प्रशिक्षण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई: प्रतिनिधी
कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती, आता ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबईच्या सिडनॅहम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री सामंत बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सामंत म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनीही सामाजिक अंतर राखून, मास्क लावून वर्गात उपस्थिती लावावी. महाविद्यालयांनीही विद्यार्थी-पालक यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ऑनलाईन – ऑफलाईन परीक्षा, कोरोनानंतरच्या काळातील नोकरीच्या संधी अशा विविध विषयांवर सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थी सुरक्षिततेची काय तयारी महाविद्यालयांनी केली आहे याची पाहणी त्यांनी केली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार व स्वागत केले. त्यानंतर प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सिडनॅहम महाविद्यालयाच्या प्राचार्य माधुरी कागलकर, उच्च शिक्षण विभागाच्या सह संचालक डॉ.सोनाली रोडे व विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यातील शिक्षकांना मिळणार खास प्रशिक्षण
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER) आणि इनिशिएटीव्ह ऑफ चेंज इन इंडिया, पाचगणी (IOFC)या संस्थेने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात (MSFDA) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामजंस्य करार केला.
यावेळी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणेचे रजिस्ट्रार जी. राजा शेखर, राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षण अभियानचे सहसंचालक प्रमोद पाटील यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च (IISER), पुणेचे संचालक जयंत उदगावकर, इनिशिएटीव्ह ऑफ चेंज इन इंडियाचे (IOFC) विश्वस्त किरण गांधी, हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक निपुण विनायक यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातील नवीन कल्पना शिकवल्या गेल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी केला पाहिजे. त्यांना इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता आली पाहिजे. यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER) या संस्थेच्या सायन्स शिक्षकांच्या माध्यमातून जास्त जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचणे. तसेच राज्यामध्ये सध्या दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये सुधारणा करणे. नवीन शैक्षणिक धोरण-२०२० नुसार शिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणे. हा या संस्थेचा उद्देश आहे. इनिशिएटिव्ह ऑफ चेंज इन इंडिया, पाचगणी (IOFC) ही संस्था ‘मै बदलूगा तो पुरा देश बदलेगा’ या संकल्पनेनुसार काम करते. या संस्थेचे ६० देशांमध्ये काम चालू आहे. परिवर्तन घडविणे, आत्मनिर्भर करणे, चरित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे कार्य संस्था करते आहे. असोसिएट डीन सौरभ दुबे यांनी IISER या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या कामकाजाविषयी माहिती दिली.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *