Breaking News

मुश्रीफांचा पलटवार, त्या धाडीतही मिळाले नाही…१०० कोटींचा दावा ठोकणार सोमय्यांनी सात दिवस येवून कोल्हापूरात रहावे आणि बघण्याचे आव्हान

कोल्हापूर : प्रतिनिधी

दोन वर्षापूर्वी आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत त्यांनी सगळी कागद पत्रे बघितली, घर कार्यालयातील कागदपत्रे धुंडाळली. त्यावेळी त्यांना कोणतीही गोष्टी मिळाली नाही. त्यांना सर्व निराधार महिलांची कागदपत्रे, वेगवेगळ्या योजनांसाठी केलेले लाभार्थ्यांचे अर्ज या गोष्टी मिळाल्या. जर त्यावेळी आयकर विभागाला काही सापडले असते तर आम्हाला उचलून नेले असते असे सांगत भाजपाचे किरीट सोमय्या यांनी केलेल्या बेजबाबदार आरोपाबद्दल त्यांच्या विरोधात १०० कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा आठभरात दाखल करणार असल्याचा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

सोमय्यांनी ज्या निवडणूक प्रतिज्ञा पत्रातील गोष्टींचा उल्लेख केला. त्या गोष्टींच्या आधारेच दोन वर्षापूर्वी आयकर विभागाने आमच्या घरांवर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. पण त्यात मिळाले काहीच नाही. जर त्यावेळी काही मिळाले असते तर त्यांनी त्यावेळीच आम्हाला अटक केले असती असेही त्यांनी सांगितले.

आयकर विभागाने या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या आधारे त्यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची कागदपत्रे नेलेली आहेत. त्याची चौकशी अद्यापही सुरु असून ती बाब न्याय प्रविष्ठ आहे. त्यावर काय बोलणार असे सांगत लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यावेळीही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवत १७ कोटी रूपये जमा केले तेच पैसे कंपनीच्या माध्यमातून आम्ही कारखान्यात गुंतविल्याचे त्यांनी सांगितले.

किरीट सोमय्या यांनी इथे कोल्हापूरात यावं सात दिवस रहावे आणि स्वत: बघावे असे आव्हान सोमय्या यांना देत एखाद्या कामासाठी लोकांना मी आव्हान केले की लोक लगेच पैसे आणून देतात की नाही हे स्वत: त्यांनी डोळ्यांनी बघावे. मला वाटतं त्यांचा काही दोष नाही. भाजपा नेत्यांना वाटले असेल म्हणून त्यांना सांगितले आणि त्यांनी आरोप केल्याचे दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.

परंतु त्यांनी केलेल्या आरोपाच्या विरोधात कोल्हापूरातील दिवाणी न्यायालयात १०० कोटी रूपयांचा फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल करणार असून आठवडाभरात हा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

भाजपाच्या दहडपशाहीपुढे काँग्रेस झुकली नाही व झुकणारही नाही नॅशनल हेराल्ड प्रकरणी एका पैशाचाही गैरव्यवहार नाही; सोनिया, राहुल गांधींना ईडीची नोटीस द्वेषभावनेने

केंद्रातील भाजपा सरकारने सोनिया व राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची नोटीस ही राजकीय …

Leave a Reply

Your email address will not be published.