राज्य सरकारकडून आज मंत्र्यांना बसण्यासाठी आणि बसून त्या त्या खात्याचा कारभार हाकण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले. त्यास काही तासांचा अवधी जात नाही तोच राज्य मंत्रिमंडळांतील मंत्र्यांसाठी राखीव असलेल्या बंगल्यांचे वाटपही आजच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाहिर करण्यात आलं.
या बंगल्यांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगल्याची चावी मिळाली आहे. तर विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी हा बंगला देण्यात आला आहे. तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अंधश्रद्धेच्या सावटाखाली असलेला रामटेक बंगला देण्यात आला आहे.
मंत्र्यांना जाहिर झालेल्या बंगल्याची यादी पुढील प्रमाणे
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर – शिवगिरी
विधान परिषद सभापती राम शिंदे – ज्ञानेश्वरी
चंद्रशेखर बावनकुळे- रामटेक
राधाकृष्ण विखे पाटील- रॉयलस्टोन
पंकजा मुंडे- पर्णकुटी
शंभूराज देसाई-मेघदूत
गणेश नाईक-पवनगड
धनंजय मुंडे-सातपुडा
चंद्रकांत पाटील-सिंहगड
गिरीश महाजन-सेवासदन
मंगलप्रभात लोढा-विजयदुर्ग
अशोक उईके- लोहगड
आशिष शेलार-रत्नशिषु
दत्तात्रय भरणे- सिद्धगड
आदिती तटकरे-प्रतापगड
शिवेंद्रराजे भोसले- पन्हाळगड
मणिकराव कोकाटे-अंबार
जयकुमार गोरे-प्रचितीगड
नरहरी झिरवाळ-सुरुची
संजय सावकारे-अंबर ३२
संजय शिरसाठ-अंबर ३८
प्रताप सरनाईक-अर्वतो ५
भरत गोगावले-सुरुची २
मकरंद पाटील-सुरुची ३
गुलाबराव पाटील-जेतवन
दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी नंदनवन हा बंगला नगरविकास खात्याचे मंत्री असताना देण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांना आनंदवन बंगल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेले वर्षा निवासस्थानही देण्यात आले होते. मात्र त्यानंतर राज्य सरकारमधील एकनाथ शिंदे यांच्यावरील जबाबदारी बदलेली असली तरी एकनाथ शिंदे यांनी वर्षा हे शासकिय निवास स्थान सोडले नव्हते. तर तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागील सरकारच्या काळात सागर हा बंगला देण्यात आला होता. तो बंगला अद्याप त्यांच्याचकडे आहे. तसेच सर्व गाठीभेटी आणि बहुतांश मुख्यमंत्री म्हणून बैठका हे सागर बंगल्यावरच घेत आहेत.
त्यामुळे वर्षा हे निवासस्थान आता उपमुख्यमंत्र्यांसाठीचे निवासस्थान बनले आहे. तर सागर बंगला हा मुख्यमंत्र्यांचा बंगला बनला आहे.