Breaking News

पंतप्रधानांच्या डिग्रीचा तो फोटो शेअर करत संजय राऊत यांचा टोला, संसद भवनाच्या…. ड्रिग्रीचा फोटो ट्विट करत पंतप्रधान मोंदीच्या मास्टर ऑफ एम.ए.साठी निवडलेल्या विषयावरून लगावला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्या क्रांतिकारी डिग्रीचा फोटो नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर फ्रेम करून लटकवा. म्हणजे पंतप्रधानांच्या डिग्रीवरून लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत, असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिला.

गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याचा आदेश रद्द ठरवल्यानंतर विरोधकांनीही हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आहे. देशाच्या पंतप्रधानांना आपली डिग्री दाखवण्याची लाज का वाटावी, असा सवाल विरोधकांकडून काल उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर येथील सभेत केला. आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील पंतप्रधानांना डिवचणारे ट्विट केले आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये एका डिग्रीचा फोटो शेअर केलाय. ही डिग्री संसद भवनाच्या मेनगेटवर टांगा, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या एका डिग्रीच्या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव असून त्यात ‘एंटायर पॉलिटिकल सायन्स’ असे विषयाचे नाव लिहिले आहे. आपल्या पंतप्रधान मोदी यांची ही डिग्री बोगस असल्याचे लोक म्हणतायत. पण ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी डिग्री आहे. नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर ही फ्रेम करून लटकवली पाहिजे. यामुळे पंतप्रधानांच्या डिग्रीवरून लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काल उद्धव ठाकरे यांनीही संभाजी नगर येथील महाविकास आघाडीच्या सभेत पंतप्रधानांच्या डिग्रीचा मुद्दा उपस्थित केला होता. पंतप्रधानांना कोणत्या महाविद्यालयाने, विद्यापीठाने डिग्री दिली असेल तर त्यात लपवण्यासारखे काय आहे. मी मुख्यमंत्री आणि जयंत पाटील कॅबिनेट मंत्री झाले तेव्हा आमच्या शाळेने आमचा सत्कार केला होता. तसा यांचा कोणत्या महाविद्यालयाने, विद्यापीठाने सत्कार केला का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या पाठोपाठ संजय राऊत यांनीही डिग्रीचा प्रश्न उपस्थित केला आहे.

Check Also

टोलप्रश्नी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र आषाढी वारीनिमित्त टोल वसुली पुढे ढकला

महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *