Breaking News

तालिका अध्यक्षांनी माजी अध्यक्षांना विधानसभेतच सुणावले भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर हरिभाऊ बागडेंनी घेतला आक्षेप

मराठी ई-बातम्या टीम

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रथेप्रमाणे विरोधी पक्षांनी सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्याचा मुद्दा सभागृहासमोर उपस्थित झाल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधकांच्या प्रस्तावाचा उल्लेख करत मला सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायचे की या प्रस्तावाचा १४ विभागांच्या मंत्र्यांशी संबध आहे. परंतु तेवढा वेळ सर्वच मंत्र्यांना उपस्थित रहावे लागणार आहे. त्यामुळे पण काही मंत्री नसतील तर त्यास राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे असे वक्तव्य केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यास माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आक्षेप घेतला त्यामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी नियमातील तरतूदी आणि काय वक्तव्य केले हे स्पष्ट करत चांगलेच सुणावले. त्यामुळे विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि तालिका अध्यक्षांमध्ये चांगलेच युध्द रंगल्याचे दिसून आले.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांचे बोलणे संपल्यावर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत म्हणाले, माझा तुमच्या वक्तव्यावर आक्षेप असून त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला प्रस्तावाबाबत मत व्यक्त करण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे तुम्ही त्यावर मत प्रदर्शित करू शकत नाही.

त्यावर भास्कर जाधव म्हणाले, नाना मी तुमचा आदर करून सांगतो की मी विरोधकांनी सादर केलेल्या प्रस्तावावर मत व्यक्त केले नाही. तर सभागृहाची मानसिकता जाणून घेण्याच्या अनुषंगाने आणि विरोधकांनी सादर केलेल्या प्रस्तावावरील चर्चेच्या अनुषंगाने आपण काही गोष्टी मांडल्याचे स्पष्ट केले.

त्यावर हरिभाऊ बागडे यांचे समाधान न झाल्याने पुन्हा भास्कर जाधव यांच्या वक्तव्याबाबत आक्षेप घेतला. त्यावर जाधव यांनी पुन्हा आपण माझी अध्यक्ष होतात त्याचा मान ठेवून मी पुन्हा सांगतो की मी प्रस्तावावर मत प्रदर्शित करत नाही. तर चर्चेच्या अनुषंगाने मी बोललो आहे. या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला अध्यक्षांचे सगळे अधिकार प्राप्त होत असतात ही माहिती कृपया लक्षात ठेवा तसेच तो कोणत्या पक्षाचा नसतो असेही त्यांनी बागडे यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्याचबरोबर मला हे ही माहित आहे की मी तात्पुरता अध्यक्ष आहे. मी पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. त्यामुळे मला या गोष्टीचे भान असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

आणि वडेट्टीवारांनी उडविली पडळकरांची खिल्ली, “नया नया पंछी ज्यादा फडफड…” वडेट्टीवार पडळकरांचा ओबीसीवरून नवा वाद

मराठी ई-बातम्या टीम ओबीसी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयात उद्या सोमवारी सुणावनी असून या पार्श्वभूमीवर ओसीबी समाजाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *