Breaking News

चुरस वाढली, संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली सहाव्या जागेवरून होणार रस्सीखेच

माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय अगोदरच जाहिर केला. त्यानंतर शिवसेनेचा एकच खासदार निवडूण जाणार असताना आणि शिल्लक राहीलेल्या मतांच्या जोरावर आणखी एक उमेदवार उभा कऱण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला संभाजी राजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. यापार्श्वभूमीवर संभाजी राजे यांना राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी शिवसेनेत यावे आणि त्यानंतर शिवसेना विचार करेल असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केल्यानंतर संभाजी राजे यांनी शिवसेनेची ऑफर नाकारली. त्यामुळे सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.
संभाजीराजे यांनी यापुढे माझा कोणत्याही पक्षाशी संबंध असणार नाही. तसेच राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेसने पाठींबा देण्याचे सुतोवाच केले. त्यामुळे मित्र पक्षांना विश्वासात न घेता पाठींबा दिल्याचे सांगत काँग्रेस आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. तर शिवसेनेने सहावी जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी शिवसेना कोणाला तिकिट देणार हा औस्तुकतेचा विषय बनला असतानाच संभाजी राजे यांनी शिवसेनेची ऑफर नाकरल्याने निवडणूकीत मतांची पळवा पळवी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वास्तविक पाहता संभाजी राजे यांची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा राष्ट्रपती कोट्यातून भाजपाला पुन्हा नियुक्ती देता येवू शकत होती. मात्र संभाजी राजे यांना भाजपाने पडद्यामागून एकट्याने मैदानात उतरविले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संभाजी राजांबद्दल एक सहानूभूतीची भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे. तसेच महाविकास आघाडीकडे विशेषतः शिवसेनेकडे शिल्लक राहणारी मतांची संख्याही जास्त आहे. जर संभाजी राजे हे राज्यसभेच्या निवडणूकीत पराभूत झाले तर त्याचे खापर आपसूकच शिवसेनेवर आणि महाविकास आघाडी सरकारवर फोडले जाणार आहे. त्यामुळे राजेंच्या पराभवाचा फटकाही भाजपा पेक्षा महाविकास आघाडीचा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाने महाविकास आघाडीच्या राजकिय नुकसानीची रणनीती संभाजी राजे यांना उभ्या करण्याच्या निमित्ताने चांगलीच आखल्याची चर्चा राज्याच्या राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.
मतांचे गणित-
३१ मे रोजी राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. तर १० जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी राज्यात सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे.आमदारांच्या एकूण संख्याबळानुसार भाजप २, शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा मिळवू शकते. मात्र राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता चुरस वाढली आहे. या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र या जागेवर शिवसेना उमेदवार देणार आहे. त्यामुळे संभाजी राजे यांच्यासमोरील पेच वाढला आहे.
भाजपाकडे मित्रपक्षांसह ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. त्यामध्ये शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेसकडे ४४ आमदार आहे. तर इतर पक्ष आणि ८ अपक्षांचे महाविकास आघडीला समर्थन आहे.
राज्यसभेचा खासदार होण्यासाठी मतांच्या कोट्याचे सुत्र ठरवण्यात आले आहे. त्यानुसार राज्याची एकूण विधानसभा सदस्यसंख्या भागिले राज्यसभेच्या रिक्त जागा + १ यानुसार कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येणार हे ठरत असते.
राज्यात २८८ आमदार, राज्यसभेच्या ६ रिक्त जागा + १ म्हणजेच २८८÷६ = ४१.१४ +१= ४२.१४ म्हणजे एका जागेसाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपा आपल्या संख्याबळामध्ये दोन खासदार निवडून आणू शकतो. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी १ खासदार निवडून आणू शकतात. सहाव्या जागेसाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. मात्र भाजपाकडे २२ तर शिवसेना आणि मित्रपक्ष मिळून ३३ मतं अतिरिक्त आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी पेच वाढला आहे. त्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे शिवसेना सहाव्या जागेसाठी ताकद लावताना दिसत आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे यांनी सर्व आमदारांना पत्र लिहून पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सहावी जागा कोणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *