कोकणातील शिवसेना उबाठाचे राजन साळवी यांचा विधानसभा निवडणूकीत पराभव झाला. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजन साळवी यांना सतत गुन्हे अन्वेषण विभागाकडून आणि स्थानिक पोलिस प्रशासनाकडून सातत्याने विविध प्रश्नी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात येत होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात येत होती. त्यातच राजन साळवी हे विधानसभा निडणूकीत पराभूत झाल्यानंतर सातत्याने भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाल्या. या चर्चेतच सुरुवातीला निष्ठावान म्हणून सांगणारे राजन साळवी हे आता योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे जाहिर केले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजन साळवी हे आज शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते असे सांगण्यात येत आहे.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राजन साळवी म्हणाले की, विधानसभेतील निवडणूकीतील पराभवानंतर मी नाराज होतो आणि आहे, मी माझ्या भावना उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या असल्याचं सांगितले.
पुढे बोलताना राजन साळवी म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर मला काही भावना समजल्या काही लोकांनी त्यांच्या भावना सांगितल्या. माझ्या पराभवाला कारणीभूत ज्या घटना आहेत. त्याबद्दल मी नक्काच नाराज होतो आणि नाराज आहे. माझ्या नाराजीच्या भावना मी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. तसेच कार्यकर्त्यांच्या भावनाही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. या सगळ्या भावना उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतल्या असल्याचे सांगितले.
राजन साळवी पुढे बोलताना म्हणाले की, मागील काही दिवसांपासून माझ्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरु आहेत. तसेच या चर्चा अधिक रंगल्या जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण यावं आणि संवाद साधावा. राजापूरला कार्यकर्त्ये आणि पदाधिकाऱ्यांशी सवाद साधला. तेव्हा सर्वांनी भावना व्यक्त केल्या की माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्या पराभवाला अनेक मंडळी कारणी भूत आहेत. तसेच तुम्ही योग्य निर्णय घ्या अशा भावना व्यक्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांना मी सांगितले की, योग्यवेळी निर्णय घेईन असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना राजन साळवी म्हणाले की, माझ्या पराभवाला काही वरिष्ठ मंडळी जबाबदार आहेत. मी आज त्यांच नावं घेऊ इच्छित नाही. मात्र कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. पक्षावर आणि माझ्यावरही दुखाचा डोंगर आला, यासाठी कोण कारणीभूत आहे हे शोधण हे गरजेचं आहे. जर हे शोधलं नाही तर आता जी वेळ माझ्यावर आलीय ती इतरांवरही येऊ शकते. अशी वेळ येऊ नये यासाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि योग्यवेळी निर्णय घेण्यास सक्षम असल्याचेही यावेळी सांगितले.